Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: प्रेयसीनं दुसऱ्याशी लग्न केलं, ब्रेकअपमुळे तरुण रेल्वेखाली जीव द्यायला गेला, पण... थरार कॅमेऱ्यात कैद! पाहा व्हिडिओ

Viral Video News: प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे आयुष्य संपवण्याचा विचार करणाऱ्या एका तरुणाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

Sameer Amunekar

प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे आयुष्य संपवण्याचा विचार करणाऱ्या एका तरुणाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. रेल्वे रुळावर मृत्यूच्या प्रतीक्षेत पडलेल्या या तरुणाला पाहून ट्रेन ड्रायव्हरने केवळ रेल्वेच थांबवली नाही, तर खाली उतरून त्याला माणुसकीच्या नात्याने समजावून सांगत जीवदान दिले.

नेमकी घटना काय?

व्हायरल झालेल्या २ मिनिटे १७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुण रेल्वे रुळांच्या मध्ये शांतपणे झोपला आहे. समोरून येणाऱ्या ट्रेनच्या चालकाने दुरूनच त्या मुलाला पाहिले आणि प्रसंगावधान राखून इमर्जन्सी ब्रेक लावत ट्रेन थांबवली. ड्रायव्हर खाली उतरला आणि व्हिडिओ बनवत त्या मुलाकडे गेला. "अरे काय करतोयस? का जीव देतोयस?" असे विचारल्यावर तो तरुण ढसाढसा रडू लागला.

त्या मुलाने सांगितले की, त्याचे एका मुलीवर ५ वर्षांपासून प्रेम होते. मात्र, तिने त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. "मी तिच्याशिवाय जगू शकत नाही," असे म्हणत तो मुलगा रडत होता. ड्रायव्हरने अत्यंत संयमाने त्याला उठवले आणि प्रेमापेक्षा आयुष्य खूप मोठे असल्याचे समजावून सांगितले.

हा व्हिडिओ '@WokePandemic' नावाच्या 'X' (ट्विटर) हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर भाष्य करण्यात आले आहे. "आजकाल प्रेम डिस्पोजेबल झाले आहे. जेव्हा एखादा पुरुष प्रेमात तुटतो, तेव्हा लोक त्याच्यावर हसतात किंवा त्याला कमकुवत म्हणतात. पण त्याच्या मनावर काय बेततेय, हे कोणीच समजावून घेत नाही," अशा आशयाची पोस्ट लिहीत समाजात पुरुषांच्या भावनांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर बोट ठेवले आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून हजारो नेटकऱ्यांनी ट्रेन ड्रायव्हरचे कौतुक केले आहे. "खरा चमत्कार ट्रेन थांबणे नाही, तर एका अनोळखी व्यक्तीने धावून येऊन त्या मुलाला सावरणे हा आहे," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर काहींनी "जोपर्यंत तुम्ही स्वतः ब्रेकअपचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत या गोष्टी हास्यास्पद वाटतात," असे म्हणत पीडित तरुणाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

Child Summer Care: सावधान! उन्हाचा कडाका वाढतोय; तुमच्या चिमुरड्यांना उष्माघातापासून 'असे' वाचवा

गोव्यातील व्यक्तीकडून बेळगावात चोरी, 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 160 ग्रॅम दागिने ताब्यात

Strait Of Hormuz Tension: "होर्मुज नाकेबंदीजवळ आलात तर समुद्रातच गाडून टाकू!" ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; अमेरिकन नौदलाला 'शूट टू किल'चे आदेश

SCROLL FOR NEXT