Mahakumbh Dainik Gomantak
देश

Viral Video: 'हा गोव्याचा Beach नव्हे...', महाकुंभात टॉवेलवर स्नान करायला गेली तरूणी, VIDEO पाहून संतापले नेटकरी

Mahakumbh: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याला सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हटले जात आहे. केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोक यात सहभागी होत आहेत.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याला सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हटले जात आहे. केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोक यात सहभागी होत आहेत. संत, ऋषी आणि भक्तांचा हा मेळावा असतो.

या महाकुंभात अनेक सेलिब्रिटी देखील पोहोचल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महाकुंभात स्नान करण्यासाठी एक मुलगी आली आहे.

तिनं फक्त पांढरा टॉवेल घातला आहे. ही मुलगी नंतर गंगेत स्नान करायला जाते. घाटावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांमधून ती जात होती. तिथं उपस्थित असलेले लोक या मुलीला पाहून आश्चर्यचकित होतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे ती मुलगी स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती.

हा व्हिडिओ @samuelina45 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. शेअर झाल्यानंतर, हा व्हिडिओ सुमारे ७० लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंटमध्ये संताप व्यक्त करत लिहिलं की, अश्लीलता पसरवणाऱ्या या लोकांना सांगायला हवं की, हा गोवा किंवा मालदीवचा समुद्रकिनारा नाही, हा प्रयागराज महाकुंभ आहे. हे श्रद्धेचे केंद्र आहे, येथे अशा अश्लीलतेला स्थान नाही. अशा विविध संतप्त प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT