Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

Goa Today's News Live Update's In Marathi: गोवा जिल्हा परिषद निवडणूक, नाताळ, पर्यटन, राजकारण, गुन्हे, अपघात यासह राज्याच्या विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
Goa Today's News Live
Goa Today's News LiveDainik Gomantak

लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

थायलंडमधून दिल्लीत दाखल झालेल्या बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधुंना गोवा पोलिसांनी अटक केली असून, आज (१७ डिसेंबर) त्यांना घेऊन गोवा पोलिस दिल्लीतून निघाले आहेत. सकाळी अकारा वाजेपर्यंत सौरभ आणि गौरव या लुथरा बंधुंना घेऊन पोलिस राज्यात दाखल होतील. हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेनमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

2006 जमीन घोटाळा प्रकरण; वाझ कुटुंबातील तिघांना अंतरिम जामीन मंजूर

वाझ कुटुंबातील तीन सदस्यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर, २००६ सालच्या जमीन घोटाळा प्रकरणात ईडी याचा तपास करत आहे. जामीनासाठी वाझ कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा बॉन्ड सादर करावा लागणार आहे.

लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

बर्च बाय रोमिओ लेनचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा गोव्यात दाखल झाले आहेत. आज त्यांना दिल्लीतून त्यांना गोव्यात आणण्यात आले. यावेळी विमानतळ आणि पोलिस स्थानकात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

हडफडे नाईट क्लब आग दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या लुथराबंधूंनाआज गोव्यात आणण्यात आले आहे. मोपा विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले. नियमानुसार, पोलिसांनी या दोघांनाही सुरुवातीला शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय तपासणीसाठी नेले. ही वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पोलीस त्यांना अधिक तपासासाठी हणजूण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत. या दोघांच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील अनेक गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.

लुथरा बंधूंची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी

हडफडे नाईट क्लब प्रकरणातील आरोपी लुथरा बंधूंना आज शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय, म्हापसा येथे पाठवण्यात आले आहे. शिवोली येथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भीत केल्यानंतर, पोलिसांनी या दोघांनाही कडक बंदोबस्तात म्हापसा येथे आणले. या ठिकाणी त्यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत नेले जाण्याची शक्यता आहे.

वाळपईत एका 41 वर्षीय महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

वाळपईत एका ४१ वर्षीय महिलेचे अपहरण करून जंगलातील एकांत ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाळपई पोलीस स्थानकात गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे.

लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

हडफडे नाईट क्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमधून गोव्यात आणल्यानंतर, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणे पसंत केले आहे.

"दरमहा 25 लाखांचा हप्ता!" – हडफडे आग प्रकरणावरून खासदार विरियातोंचा सरकारवर आरोप

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आरपोरा येथील 'बिर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लब आग प्रकरणावरून राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हडफडे येथे हा क्लब चालवण्यासाठी दरमहा २५ लाख रुपयांची लाच (हप्ता) दिली जात होती, असा दावा त्यांनी केला आहे. या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा बळी गेला असून, या मृत्यूंना सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, खासदार फर्नांडिस यांनी पंचायती राज व्यवस्थेवरूनही सरकारला धारेवर धरले. ७३ व्या घटनादुरुस्तीबाबत आणि गोव्यातील पंचायती राजच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने केंद्राला खोटे सांगितले असल्याचा आरोप त्यांनी केला. गावांचे अधिकार हिरावून घेतले जात असून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हडफडे आग प्रकरण: लुथरा बंधूंना म्हापसा न्यायालयात केले हजर

हडफडे नाईट क्लब आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंनाआज कडक पोलीस बंदोबस्तात म्हापसा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी त्यांना थेट न्यायालयासमोर नेले.

नानोडा येथे घराला आग; पाच लाखाहून अधिक रुपयांची हानी

नानोडा येथे घराला आग. पाच लाखाहून अधिक रुपयांची हानी. अग्निशमन दलातर्फे आग नियंत्रणात. आग लावल्याचा संशय. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी.

"मडगावचे ट्रॅफिक आयलंड्स उद्ध्वस्त, तर फुटपाथवरच रस्ता!"

मडगाव शहरातील ढासळलेल्या पायाभूत सुविधांवरून 'मडगावचो आवाज' संघटना आणि युवा नेते प्रभाव नाईक यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरातील ट्रॅफिक आयलंड्सची दुरवस्था झाली असून ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

'पाटकर यांनी आधी काँग्रेसवर लक्ष केंद्रित करावे'

जीपीसीसीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आरोप केला आहे की आप पक्ष मतांचे विभाजन करत आहे आणि केवळ काँग्रेसला लक्ष्य करत आहे. यावर आपचे अमित पालेकर यांनी उत्तर देताना म्हटले आहे की पाटकर यांनी आधी काँग्रेसवर लक्ष केंद्रित करावेकारण त्यांना अनेक मतदारसंघांमध्ये बूथ एजंट शोधण्यातही अडचण येत आहे.जिथे आम्ही उमेदवार उभे केले आहेत तिथे आप पक्ष जोरदारपणे निवडणूक लढवत आहेअसे पालेकर म्हणाले.

39 वर्षीय आरोपीचा जामीन अर्ज पणजी न्यायालयाने फेटाळला

दक्षिण गोव्यातील एका १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण, वारंवार बलात्कार आणि तिला गर्भवती केल्याचा आरोप असलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीचा जामीन अर्ज पणजी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. मूळचा महाराष्ट्रातील असलेला हा आरोपी गेल्या काही काळापासून या गंभीर गुन्ह्याखाली अटकेत आहे.

धारगळमध्ये गोवा फॉरवर्डला मोठे बळ; उदय मांद्रेकर यांचा अनिकेत साळगावकर यांना जाहीर पाठिंबा

धारगळ जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणुकीला आता एक नवे वळण मिळाले आहे. अपक्ष उमेदवार उदय मांद्रेकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार अनिकेत साळगावकर यांना आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला असून, आपली उमेदवारी मागे घेतली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कलंगुटकर आणि राम नागवेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मांद्रेकर यांच्या या निर्णयामुळे धारगळमध्ये अनिकेत साळगावकर यांची स्थिती अधिक मजबूत झाली असून, गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी; हणजूण पोलिसांत रवानगी

हडफडे आग प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या लुथरा बंधूंना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हणजूण पोलिसांनी या आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ५ दिवस मंजूर केले.

सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींनी आरोग्यविषयक तक्रारी केल्यामुळे, खबरदारी म्हणून त्यांची उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना हणजूण पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आता पोलीस कोठडीत या भीषण दुर्घटनेशी संबंधित आणि नाईट क्लबच्या अवैध संचालनाबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

"गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगास यांनी गोव्यातील भाजप सरकार आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करत नाईटक्लब संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. गोव्यात बाहेरच्या व्यक्तींद्वारे १०० हून अधिक बेकायदेशीर क्लब चालवले जात असून त्याला सत्ताधारी नेत्यांचा वरदहस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या क्लबचा उल्लेख करत, तो 'नॉन-डेव्हलपमेंट झोन' मध्ये असूनही अद्याप बंद करण्यात आलेला नाही, असा दावा केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com