Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Viral News: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धोकादायक प्रकार समोर आला आहे.

Sameer Amunekar

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धोकादायक प्रकार समोर आला आहे. चालत्या बाईकवर एक महिलेने जीवाशी खेळ करत स्टंट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तरूणी हेल्मेटशिवाय, दोन्ही हात सोडत अतिशय वेगात बाईक चालवताना दिसते. या धोकादायक कृतीमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होताच इंदूर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार केवळ वाहतूक नियमांचा भंग नाही तर सार्वजनिक सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण करणारा आहे. प्राथमिक तपासानुसार, तरूणीने ना हेल्मेट घातले होते ना बाईकवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली होती. दोन्ही हात मोकळे ठेवून केलेला हा स्टंट अत्यंत जोखमीचं असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

इंदूर पोलिसांनी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाची जबाबदारी दिली आहे. या तरूणीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरूणीची ओळख पटवून तिला चौकशीसाठी बोलावले जाईल.

कारवाईची तयारी

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ओळख पटल्यावर महिलेचे समुपदेशन करण्यात येईल, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तरूणीवर चलनाची कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे धोकादायक स्टंट समाजात चुकीचा संदेश देतात आणि त्यामुळे इतर तरुणही प्रेरित होऊ शकतात, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

नागरिकांना इशारा

इंदूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, आणि अशा धोकादायक स्टंटपासून दूर राहा. हेल्मेट न घालणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हे केवळ कायद्याने गुन्हा नसून, जीवावर बेतणारा धोका देखील आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर "स्टंट व्हिडिओ संस्कृती"बद्दल चर्चा रंगली आहे आणि प्रशासनाकडून यावर कठोर पावले उचलण्याची मागणीही सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT