academic pressure Dainik Gomantak
देश

Viral Video: "होमवर्क जमणार नाही, आम्हाला मारा पण मुलाचे मार्क कापू नका" अभ्यासाला कंटाळून वडिलांनी जोडले हात

Viral Video Father Homework: अनेक पालकांच्या तर पूर्ण सुट्ट्या मुलांचे गृहपाठ पूर्ण करण्यातच जातात, सध्या अशाच एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होतोय

Akshata Chhatre

कानपूर: जून महिना सुरू होताच कडक उन्हाळ्यासोबतच मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागतात. पण, या सुट्ट्या 'हॉलिडे होमवर्क'शिवाय अपूर्ण असतात. शाळेतून हे मुलांना काम मिळतं, पण प्रत्यक्षात ते पालकांनाच करावं लागतं. अनेक पालकांच्या तर पूर्ण सुट्ट्या मुलांचे गृहपाठ पूर्ण करण्यातच जातात. सध्या अशाच एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

'अतरंगी' गृहपाठ, पालकांची वाढती डोकेदुखी

सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवणं म्हणजे पालकांसाठी एक मोठी डोकेदुखी असते. त्यातही, लहान मुलांचा गृहपाठ इतका अनोखा आणि 'अतरंगी' असतो की, तो पूर्ण करताना पालक अक्षरशः वैतागून जातात. शाळांमधून एकाहून एक सरस प्रोजेक्ट्स दिले जातात, जे बनवताना पालक अक्षरशः डोक्याला हात लावून बसतात.

याच समस्येशी झगडत असलेल्या एका पित्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. आपल्या मुलाच्या हॉलिडे होमवर्कला कंटाळलेला हे वडील व्हिडिओमध्ये हात जोडून म्हणतायत की, "जर माझ्या मुलाची मॅडम हा व्हिडिओ बघत असेल, तर मॅडमजी, तुम्ही जे प्रोजेक्ट वर्क दिलं आहे, ते आमच्याकडून बनत नाहीये. कृपया त्याचे नंबर कापू नका."

'सूर्यफूल नाहीतर ग्लोब, आता ३६ पोस्टर फाडले!'

तो पुढे म्हणतो, "मॅडम मार्क्स कापतील म्हणून मुलगा आम्हाला रोज त्रास देतोय. आतापर्यंत ३६ पोस्टर फाडले आहेत. आता आमच्याकडून नाही होत आहे."

लहान मुलांना शाळेत अनेकदा थर्माकोलचे प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी दिले जातात, जे मुलांना स्वतःला जमत नाहीत आणि ते बनवताना पालकांची अक्षरशः दमछाक होते.

याच त्रासातून वैतागून ते वडील व्हिडिओमध्ये सांगतायत की, "कधी सूर्यफूल बनवायला सांगतात, तर कधी ग्लोब. तुम्ही आम्हाला मारून घ्या, पण आमच्या मुलाचे मार्क्स कापू नका." त्यावेळी त्याचा मुलगा हसताना दिसतो. व्हिडिओच्या शेवटी बाप-मुलगा दोघेही हात जोडून नम्रपणे विनंती करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

Drug Menace in Goa: ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’! CM सावंतांचा कडक इशारा; ड्रग्जमुक्त गोवा घडवण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

SCROLL FOR NEXT