Dangerous bike stunt accident video Dainilk Gomantak
देश

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Bike Stunt Viral Video: सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा तसेच धडा शिकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

Manish Jadhav

Bike Stunt Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा प्रत्येकाची एक महत्त्वाची गरज बनला आहे. लोक इतर गोष्टींशिवाय काही काळ राहू शकतील, पण सोशल मीडियापासून दूर राहणे त्यांना कठीण जाते. हे माध्यम केवळ निखळ मनोरंजनच करत नाही, तर ताज्या बातम्या आणि घटनांचे अपडेट्सही क्षणात पोहोचवते. जर तुम्हीही दररोज सोशल मीडियावर वेळ घालवत असाल, तर दररोज काही ना काही धक्कादायक किंवा मजेशीर कंटेंट तुमच्या फिडवर येत असेलच. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा तसेच धडा शिकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव वेगात आपली 'ड्यूक' बाईक चालवताना दिसतो. बाईक चालवत असतानाच त्याच्या डोक्यात स्टंटबाजीची खुमखुमी येते आणि तो रील बनवण्यासाठी स्टंट करण्यास सुरुवात करतो. तो बाईकचे पुढचे चाक हवेत उचलून 'व्हीली' मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचवेळी त्याचा तोल ढळतो आणि पुढच्याच सेकंदाला तो गाडीवरुन थेट डांबरी रस्त्यावर आपटतो.

सोशल मीडियावर (Social Media) केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि रील व्हायरल करण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालणे या तरुणाला भलतेच महाग पडले. या अपघातात त्याला किती गंभीर दुखापत झाली हे स्पष्ट झाले नसले, तरी अशा प्रकारची जीवघेणी स्टंटबाजी किती घातक ठरु शकते याचा जिवंत पुरावा या व्हिडिओतून समोर आला.

हा थरारक व्हिडिओ 'एक्स' वर @iam___smash नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला असून, त्याला 'फुल्ली सॅटिस्फाईड' असे उपरोधिक कॅप्शन देण्यात आले. हा व्हिडिओ पोस्ट होताच हजारो लोकांनी तो पाहिला असून कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी तरुणाच्या या बेजबाबदार वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "हे अगदी बरोबर झाले", तर दुसऱ्या युजरने लिहिले, "हा याच लायकीचा होता, अशा स्टंटबाजांना असाच धडा मिळायला हवा."

तर काही युजर्सनी सुरक्षा उपकरणांशिवाय असे जीवघेणे प्रकार करु नयेत असा सल्ला दिला. रीलच्या मोहात रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ एक मोठा धडा ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT