Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: फोटोसाठी हायवेच्या मधोमध बसलं जोडपं; अचानक कार आली अन्... तुम्हीच बघा पुढं काय झालं?

Viral Video News: सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तरुण पिढी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तरुण पिढी कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका भरधाव महामार्गाच्या (हायवे) मध्यभागी बसून फोटो काढणाऱ्या एका जोडप्याला समोरून येणाऱ्या कारने चिरडले असते, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे, आपली चूक मान्य करण्याऐवजी या जोडप्याने चक्क कार चालकाशीच हुज्जत घातली, ज्यामुळे नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार चालक आपल्या धुनमध्ये गाणी ऐकत गाडी चालवताना दिसतो. पहिल्या नजरेत तो केवळ मनोरंजनात मग्न आहे असे वाटते, परंतु त्याचे पूर्ण लक्ष रस्त्यावर होते. महामार्ग रिकामा असल्याने गाड्यांचा वेग प्रचंड असतो, अशा परिस्थितीतही या चालकाने दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद ठरली.

कार काही अंतरावर पोहोचताच चालकाला रस्त्याच्या मधोमध एक तरुण आणि तरुणी बसलेले दिसले. ते दोघेही एखाद्या बागेत बसल्यासारखे आरामात पोज देऊन फोटो काढण्यात मग्न होते. हायवेवर अशा प्रकारे बसणे म्हणजे मृत्यूला थेट निमंत्रण देणेच होते. चालकाने दुरूनच त्यांना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता जोरात ब्रेक दाबले. कार अगदी काही फूट अंतरावर थांबली आणि एक मोठा अनर्थ टळला.

चूक कबूल करण्याऐवजी अरेरावी

अपघात टळल्यानंतर चालक साहजिकच संतापला. "मरायचे आहे का? हायवेवर कोण फोटो काढते?" अशा शब्दांत त्याने त्या जोडप्याला झापले. कोणत्याही सुजाण नागरिकाने अशा वेळी माफी मागितली असती, परंतु या जोडप्याने उलट चालकालाच सुनावले. "रस्ता एवढा मोठा आणि रिकामा असताना आम्ही तुम्हाला दिसलो नाही का?" असा विचित्र तर्क त्यांनी मांडला. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता, उलट ते चालकाशीच वाद घालत राहिले.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रस्ते सुरक्षा नियमांचा अशा प्रकारे फज्जा उडवणाऱ्या जोडप्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. "केवळ नशिबामुळे ते वाचले, पण त्यांच्या अहंकारामुळे दुसऱ्याचा जीव जाऊ शकला असता," अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हायवेवर अशा प्रकारे थांबणे किंवा बसणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT