Viral Video  Dainik Gomantak
देश

Viral Video: त्रिशूळ घेऊन धावले भगवान शंकर, मुलाने ठोकली धुम की व्हिडिओ झाला 'सुपरहिट'; नेटकरी म्हणाले, 'आता तो रोज मंदिरात जाईल'

Viral Funny Video: सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असून लोक हसता-हसता पोट धरून बसले आहेत. या व्हिडिओमध्ये नकली भगवान शंकर हातात त्रिशूळ घेऊन एका लहान मुलाच्या मागे धावताना दिसत आहेत.

Sameer Amunekar

सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असून लोक हसता-हसता पोट धरून बसले आहेत. या व्हिडिओमध्ये नकली भगवान शंकर हातात त्रिशूळ घेऊन एका लहान मुलाच्या मागे धावताना दिसत आहेत. हा प्रकार पाहून उपस्थित लोकांबरोबरच व्हिडिओ पाहणारे नेटकरी अक्षरशः हसू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार एका धार्मिक कार्यक्रमातील जागरणाचा आहे. या जागरणात भगवान शंकराची वेशभूषा केलेला तरूण अचानक एका मुलाला घाबरवतो. तो त्रिशूळ हातात घेत मुलाच्या मागे धावायला सुरुवात करतो. अचानक भोले बाबा आपल्या मागे त्रिशूळ घेऊन धावत असल्याचे पाहताच तो मुलगा भलताच घाबरला. भीतीने तो हात जोडत पळत सुटला.

हा प्रकार पाहणाऱ्या मंडळींनी मोठ्या आवाजात हास्यकल्लोळ केला. मुलाच्या चेहऱ्यावरची भीती आणि भोले बाबांचा खोडकर अंदाज पाहून उपस्थित लोक थांबून-थांबून हसू लागले. काही जणांनी लगेचच मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. कुणीतरी मजेत लिहिलं, “आतापासून हा मुलगा दररोज मंदिरात जाणार हे नक्की!” तर आणखी एकाने म्हटलं, “भोले बाबांनी मुलाला घाबरवण्यापेक्षा भक्तीची शिकवण दिली आहे.”

सध्या हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर धुमाकूळ घालत असून काही तासांत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. मजेशीर घटनांमुळे सोशल मीडियावर वातावरण हलकं-फुलकं होत असलं तरी मुलांच्या भीतीशी खेळ करणं योग्य नाही, अशीही काहींनी आठवण करून दिली आहे.

या सगळ्या गोंधळात मात्र नकली भोले बाबांचा डान्स आणि त्रिशूळसह केलेली मस्ती लोकांना प्रचंड भावली असून हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियात 'सूर्य' तळपणार, कांगारुंना करणार सळो की पळो, हिटमॅन-किंग कोहलीचा 'तो' रेकॉर्ड निशाण्यावर?

भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर 'नापाक डोळा'! बांगलादेशात दाखवले आसाम-अरुणाचल; मोहम्मद युनुस यांच्या नकाशा भेटीवरुन नवा वाद

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT