Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

Viral Jugaad Video: 'जुगाड' ही अशी गोष्ट आहे, जी भारतात जवळजवळ प्रत्येकजण करतो. जेव्हा जेव्हा गरज पडते, तेव्हा लोक काही ना काही जुगाड करुनच टाकतात.

Manish Jadhav

Viral Jugaad Video: 'जुगाड' ही अशी गोष्ट आहे, जी भारतात जवळजवळ प्रत्येकजण करतो. जेव्हा जेव्हा गरज पडते, तेव्हा लोक काही ना काही जुगाड करुनच टाकतात. कधीकधी तर असे जुगाड पाहायला मिळतात, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते आणि मग त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात एकाहून एक सरस जुगाड दिसले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

तुम्ही स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) पाहिले असेल की, अनेकांना पोहता येत नसल्यामुळे किंवा बुडण्याची भीती वाटत असल्याने ते ट्यूब घेऊन पाण्यात उतरतात. पण आपले 'देसी' लोक स्विमिंग पूलमध्ये नाहीतर नदीत उडी मारतात आणि तीही त्यांच्या अनोख्या जुगाडासह!

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या (Tractor) ट्यूबमध्ये हवा भरतो आणि त्याला एक खाट (Cot) बांधतो. यानंतर तो त्या खाटेला पकडून पाण्यात उडी मारतो. ट्यूबमुळे तो बुडत नाही आणि मग खाटेवर बसून पाण्याच्या प्रवाहाचा (Water Flow) मनसोक्त आनंद घेतो.

दरम्यान, हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @PalsSkit नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना गंमतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अमेरिका काय म्हणत होता, काय आहेस तू, आज आम्ही म्हणतो, काय आहेस तू?" बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 81 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. दुसरीकडे, व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले की, "जुगाडमध्ये आम्हीच पुढे आहोत." दुसऱ्याने लिहिले की, "जुगाडमध्ये कोणीच बरोबरी करु शकत नाही." तर तिसऱ्याने लिहिले की, "एक से बढ़कर एक जुगाडी आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: गोंयकारांना विराटचं सरप्राईझ!! समुद्रकिनारी 'One8 Commune'ची ग्रँड एन्ट्री, वाढदिवसाच्या दिवशी करणार शानदार उद्घाटन; Watch Video

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवन सभागृह होणार खुले! कृष्णकक्षाचे उद्‍घाटन; आनंदमठ नाटकाचा रंगणार प्रयोग

Tragic Death: दुर्दैवी! तिसऱ्या मजल्यावरून तोल गेला, थेट कोसळला खाली; इमारतीवरून पडून गवंडी ठार

Ranji Trophy: पंजाबची चिवट फलंदाजी! सामना अनिर्णित; 3 गुण कमावत गोव्याची अव्वलस्थानी झेप

Horoscope: सुखप्राप्तीचा दिवस! कार्तिक पौर्णिमा देणार भरभरुन; 'या' राशींसाठी राजयोग

SCROLL FOR NEXT