पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर मंगळवारी हिंसाचार उसळला. येथे जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बीरभूममधील रामपूरहाट येथील आहे. रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. (Violent violence in Bengal after the assassination of TMC leader)
या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एवढेच नाही तर डीएमसह बीरभूमचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 11 जणांना अटक, DGP मनोज मालविया यांनी सांगितले की, आतापर्यंत 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून 7 मृतदेह सापडले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय एसडीपीओ रामपुरहाट यांना हटवण्यात आले आहे. एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन रामपुरहाटमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग, एडीजी वेस्टर्न रेंज संजय सिंह आणि डीआयजी सीआयडी ऑपरेशन मिराज खालिद यांचा समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे, टीएमसीचे (TMC) प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, रामपूरहाटमध्ये आगीमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पण त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
हा स्थानिक ग्रामीण संघर्ष आहे. एक दिवस आधी टीएमसी नेत्याची हत्या (Murder Case) झाली होती. ते खूप लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
TMC नेत्याची (TMC Leader) हत्या पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी बीरभूमच्या रामपुरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी दोन नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. टीएमसी पंचायत नेत्यावर अज्ञात लोकांनी बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यानंतर अज्ञातांनी त्याच्यावर बॉम्ब फेकला. त्यानंतर त्याला रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.