Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence: 7 महिन्यांनंतर इंटरनेट सुरु होताच मणिपूरमधील परिस्थिती चिघळली, पुन्हा दंगलीत 13 जणांचा मृत्यू!

Manipur Violence: मणिपूरमध्ये सोमवारी दुपारी उसळलेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनेत किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Manipur Violence: मणिपूरमध्ये सोमवारी दुपारी उसळलेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनेत किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, दुपारच्या सुमारास तेंगनौपाल जिल्ह्यातील सैबोलजवळील लेथिथू गावात दोन गटांमध्ये जोरदार गोळीबार झाला. मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागात गेल्या सात महिन्यांपासून इंटरनेट बंदी होती, जी सरकारने रविवारी हटवली. इंटरनेटवरील बंदी उठवताच हिंसाचाराची ही ताजी घटना समोर आली आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सर्वात जवळचे सुरक्षा दल या ठिकाणापासून सुमारे 10 किमी दूर होते. आमचे सैन्य घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना लेथिथू गावात 13 मृतदेह सापडले." सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहांजवळ कोणतीही शस्त्रे आढळून आली नाहीत. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "असे दिसते की मृत व्यक्ती दिसतात. ते लेथिथू गावातून नाही तर दुसऱ्या ठिकाणाहून आले आहेत." पोलिसांनी किंवा सुरक्षा दलांनी मृत लोकांच्या ओळखीची पुष्टी केली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरु केला.

संघर्ष कधी सुरु झाला

दरम्यान, 3 मे रोजी मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती. या संघर्षांमध्ये किमान 182 लोक मारले गेले आणि सुमारे 50,000 लोक बेघर झाले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये 3 मेपासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ती 23 सप्टेंबरला काही काळासाठी हटवण्यात आली होती पण 26 सप्टेंबर रोजी पुन्हा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती.

लोकसंख्या किती आहे

दुसरीकडे, मणिपूरच्या लोकसंख्येच्या 53 टक्के लोकसंख्या मैतई समुदयाची आहे, जे ते बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. त्याचवेळी, नागा आणि कुकी आदिवासींची लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे आणि ते बहुतेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bogus Voter: ..सापडला बोगस मतदार! नेपाळी नागरिकाकडे गोव्‍याची कागदपत्रे; सुकूर-पर्वरी येथील नोंदविला पत्ता

Mungul Margao: गँगवारने मडगाव हादरले! थरारक पाठलाग, कोयते, बाटल्‍यांनी हल्ला; दोघे गंभीर, गाडीवर गोळीबार

Rashi Bhavishya 13 August 2025: आर्थिक नियोजनात यश,आरोग्याची काळजी घ्या; प्रवास टाळावा

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT