Vinesh Phogat Dainik Gomantak
देश

Vinesh Phogat: 'गोल्ड'ची संधी हुकली! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट का ठरली अपात्र? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Paris Olympic 2024: विनेशला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले. तिने 50 किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती.

Manish Jadhav

Vinesh Phogat disqualified from Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला विनेश फोगट पहिले गोल्ड मेडल मिळवून देणार हे नक्की होते, पण तिला अपात्र घोषित करण्यात आल्याने तिच्यासह देशवासीयांना मोठा धक्का बसला. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले. तिने 50 किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 50 किलो गटात तिचे वजन थोडे जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. विनेशला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी होती, मात्र आता तिचे सिल्वर पदकही हुकले.

दरम्यान, गोल्ड मेडलसाठी स्पर्धा आज (7 ऑगस्ट) होणार होती. तत्पूर्वी, विनेश बाद ठरली. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर तिचे वजन 50 किलोच्या मर्यादेशी जुळत नसल्याचे सांगण्यात आले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) देखील याबाबतची अपडेट दिली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून सांगण्यात आले की, विनेश फोगट अपात्र ठरणे खेदजनक आहे.

अमेरिकन रेसलरला कडवी टक्कर देणार होती?

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ती गोल्ड मेडल जिंकेल असा विश्वास होता. विनेशने मंगळवारी महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता. विनेशची फायनल बुधवारी (7 ऑगस्ट) अमेरिकेच्या ॲन सारा हिल्डब्रँडशी होणार होती. यापूर्वी तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळची विश्वविजेती युई सुसाकीचा 50 किलोमध्ये पराभव केला होता.

विनेशने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले

जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती विनेश इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर तिचे स्वप्न भंगले. विनेश, प्रसिद्ध फोगट बहिणींपैकी एक असून तिने रिओ 2016 मध्ये महिलांच्या 48 किलो फ्रीस्टाइल गटात ऑलिम्पिक पदार्पण केले होते, परंतु गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे तिला उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. टोकियो 2020 मध्ये महिलांच्या 53 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत जिंकण्याची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विनेशला पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT