Rahul Gandhi & Raghuram Rajan
Rahul Gandhi & Raghuram Rajan Dainik Gomantak
देश

VIDEO: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन 'भारत जोडो यात्रेत' सामील

दैनिक गोमन्तक

Bharat Jodo Yatra: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन बुधवारी सकाळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाले. राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील 'भारत जोडो यात्रेचे' व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, ज्यामध्ये राहुल गांधी आणि रघुराम राजन एकत्र दिसत आहेत.

दरम्यान, 7 सप्टेंबर 2022 रोजी भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून 'भारत जोडो यात्रा' सुरु झाली आहे. सुमारे 150 दिवसांत 3,500 किलोमीटरहून अधिक पायी प्रवास राहुल गांधी (Rahul Gandhi) करणार आहेत. 'भारत जोडो यात्रेचा' प्रवास बहुधा पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी संपेल. आतापर्यंत ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमार्गे राजस्थानमध्ये पोहोचली असून येथून ती हरियाणामध्ये (Haryana) दाखल होणार आहे. यात्रेत आतापर्यंत अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

तसेच, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वयंभू गॉडमॅन नामदेव दास त्यागी (कॉम्प्युटर बाबा म्हणून ओळखले जाणारे), अभिनेत्री स्वरा भास्कर आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांच्यासह अनेक विरोधी पक्षांतील नामवंत राजकारणी देखील या यात्रेत सामील झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

‘’जेव्हा त्यांनी हक्काची मागणी केली तेव्हा...’’, POK मध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशाही

Cashew Fest Goa 2024: ध्वनी भानुशालीचे सादरीकरण, डिजे हर्षा; काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाची झलक Video

Panaji News : वितरणातील त्रुटींमुळेच पाणीटंचाईचे संकट; मुख्य अभियंता प्रमोद बदामी

SCROLL FOR NEXT