Video Viral Dainik Gomantak
देश

ते लवकरच यमराजाला भेटतील...! खऱ्या आयुष्यात सबवे सर्फर्स गेम खेळणाऱ्या पट्ट्यांचा Video Viral

Video Viral: तुम्ही तुमच्या लहानपणी कधीतरी सबवे सर्फर्स गेम खेळला असालच. तोच खेळ ज्यामध्ये एक माणूस रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनवरुन धावतो आणि त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे एक पोलिस धावतो.

Manish Jadhav

Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सर्व काही शक्य झालं आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन आहे. आता जेव्हा लोक स्मार्ट फोन वापरतात तेव्हा त्यांच्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहणे देखील सामान्य झाले आहे. तुम्हीही सोशल मीडियावर असाल तर तुम्ही दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ देखील पाहत असालच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल.

सोशल मीडियावर तूफान व्हायरल होणारा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही पाहा

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

तुम्ही तुमच्या लहानपणी कधीतरी सबवे सर्फर्स गेम खेळला असालच. तोच खेळ ज्यामध्ये एक माणूस रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनवरुन धावतो आणि त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे एक पोलिस (Police) धावतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये, एकामागून एक दोन लोक पुलावरुन चालत्या ट्रेनच्या टपावर उड्या मारताना दिसत आहेत. यानंतर, गेममध्ये घडते तसे एक व्यक्ती ट्रेनच्या विरुद्ध दिशेने धावू लागते. थोड्या वेळाने तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि मग दोघेही पळून जाऊ लागतात. काही अंतर धावल्यानंतर, दुसरा माणूस खाली बसतो आणि पहिला अजूनही धावताना दिसतो. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सोशल मीडिया यूजर्सच्या कमेंट

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटने पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भाऊ खऱ्या आयुष्यात सबवे सर्फर्स खेळ खेळत आहेत.' बातमी लिहिपर्यंत 58 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले की, ते लवकरच यमराजाला भेटतील. तर दुसऱ्याने लिहिले की, भाऊ सबवे सर्फर्स खेळ खेळत आहेत. तिसऱ्याने लिहिले - अरे, ते पोलिस काका कुठे आहेत? चौथ्याने लिहिले की, त्यांना भीती वाटत नाही का? सबवे सर्फर्समुळे कोणीही इतके प्रेरित होऊ नये....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT