Video Dainik Gomantak
देश

Video: फोनवर स्क्रोल करण्यात व्यस्त असलेला माणूस पडला दिल्ली मेट्रो ट्रॅकवर

दिल्लीच्या ईशान्य भागात शाहदरा मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली:आपला फोन (Mobile) बघण्यात व्यस्त असलेला एक माणूस दिल्लीतील मेट्रो ट्रेनच्या (Metro Train) रुळांवर अचानक पडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये (Video) दाखवल्याप्रमाणे प्लॅटफॉर्मवर चालत असलेला एक माणूस त्याच्या फोनमध्ये मग्न होता आणि त्याचा पाय अचानक प्लॅटफॉर्मवरून खाली घसरला.

तो पडताच त्याने स्वत:ला सावरत धडपडत उठला. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) कर्मचारी त्याच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. हे कर्मचारी त्या माणसाच्या अगदी पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर होते. त्यापैकी एकाने उडी मारून रुळांवरून मेट्रो ट्रेन येण्याआधी त्या व्यक्तीला वर ढकलले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात शाहदरा मेट्रो स्टेशनवर शुक्रवारी ही घटना घडली.

नेहमी रेल्वे प्लॅटफॉर्मवरून चालत असताना आपण नियमांचे पालन केले पाहिजे हे वारंवार सांगितले जाते. धावत्या रेल्वेमध्ये चढू किंवा उतरू नये हेही वारंवार रेल्वे विभागाकडून सांगितले जाते. पण सर्वसामान्य जनता गडबडीत या नियमांना विसरून जाते. आणि अशा दुर्घटना घडतात. याच दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर RPFचे जवा तैनात केले जातात. चूकून अशा घटना घडल्यास हे जवानच प्रवाशांची जीव वाचवितात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT