Video Dainik Gomantak
देश

धक्कादायक ! तरुणीला विवस्त्र करुन नराधमांनी बनवला Video, पाच जण गजाआड

Hamirpur Crime: हमीरपूर जिल्ह्यात सिटी फॉरेस्ट पार्कजवळील जंगलात प्रेमी युगुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Hamirpur District: हमीरपूर जिल्ह्यात सिटी फॉरेस्ट पार्कजवळील जंगलात प्रेमी युगुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांसह पाच जणांना अटक केली आहे. एकाचा शोध सुरु आहे, परंतु अद्याप पीडितेची बाजू समोर आलेली नाही.

दरम्यान, एसपी शुभम पटेल यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन आरोपी तरुणांची ओळख पटली आहे. पीडित पक्षाचा शोध लागलेला नाही. एसआय राजेश कुमार, कन्हैया शर्मा, प्रीतम कश्यप आणि अरविंद उर्फ ​​कमल निषाद यांच्या तक्रारीवरुन शहरातील मोहल्ला गौरा देवी येथील रहिवासी आणि दोन किशोरवयीन मुलांवर विनयभंग आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपींनी लोकांना व्हिडिओ व्हायरल करु नका असे आवाहन केले आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली

व्हायरल झालेला व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी तरुण प्रेमी युगुलांना मारहाण करताना दिसत आहेत. यामध्येच एका आरोपीने तरुणीवर जबरदस्ती केली. तरुणीने विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला शिवीगाळ करत बेल्ट आणि काठीने मारहाण केली. एका आरोपीने (Accused) या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. तर इतर आरोपींनी या प्रेमी युगुलाकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्यांना देण्यात आली.

जंगलात लपून ते तरुण मुलींची शिकार करायचे

पोलिसांच्या (Police) चौकशीत असेही समोर आले आहे की, 'आरोपी तरुण हे शहराला लागून असलेल्या जंगलात लपून बसतात आणि प्रेमी युगुलांना आपला निशाणा बनवतात. वास्तविक, सिटी फॉरेस्ट शहरापासून जवळच आहे. इथे कमी जास्त प्रमाणात प्रेमी युगुल येत राहतात. यातच हे प्रेमी युगुल गुपचूप तिथून जात होते. याचाच फायदा घेत आरोपींनी त्यांच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन वसुली केली.'

प्रकरण गंभीर आहे, बलात्काराचे कलम वाढले पाहिजे

सरकारी वकील नरेश चंदेल (Naresh Chandel) म्हणाले की, 'ही बाब अत्यंत गंभीर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्यामध्ये बलात्कार आणि आयटी कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर विनयभंगाचेही कलम लावण्यात आले आहे. मात्र बलात्काराच्या कलमात वाढ व्हायला हवी.'

दुसरीकडे, वनविभागाच्या देखरेखीअभावी आणि बजेटअभावी काही वर्षातच हे शहर जंगल निर्जन झाले. या निर्जन ठिकाणी मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या प्रेमीयुगुलांचा पाठलाग आजूबाजूचे तरुण अनेकदा करतात आणि त्यांना पकडून मारहाण करुन पैसे उकळतात.

तसेच, याप्रकरणी पोलिसांनी अनेकदा कारवाईही केली आहे. त्याच ठिकाणी या प्रेमी युगुलांना आरोपी तरुणांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपींना त्यांना मारहाण केली. यातच एका आरोपीने या मारहाणीचा व्हिडीओ बनवला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी शिवीगाळ करुन पैशांची मागणी करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT