Vice President Venkaiah Naidu Farewell Dainik Gomantak
देश

Vice President Farewell: कोणतंच काम नायडुंसाठी ओझं नव्हतं ;पंतप्रधान मोदी

Vice President Venkaiah Naidu: कोणतंही काम नायडूंसाठी ओझं नव्हतं अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी व्यंकय्या नायडूंची स्तुती केली आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांना आज संसदेत निरोप देण्यात आला असून, त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने झाली. आता त्यांच्या जागी जगदीप धनखर हे देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत. व्यंकय्या यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींशिवाय (PM Modi) विरोधी पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांच्या निरोपाच्या वेळी पीएम मोदींनी (PM Modi) राज्यसभेत सांगितले की, मी व्यंकय्या नायडूंना अनेक भूमिकांमध्ये पाहिले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांच्यासोबत काम करताना, मी व्यंकय्या यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही पाहिले आहे आणि त्यांनी प्रत्येक जबाबदारी मोठ्या समर्पणाने पार पाडली आहे.

जगदीप धनखर 11 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार

देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी रविवारी रात्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. यावेळी धनखड आणि त्यांची पत्नी सुदेश यांचे व्यंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांनी स्वागत केले. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली आणि नंतर नायडू यांनी धनखर यांना निवासस्थान आणि सचिवालयाची भेट घडवून आणल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

SCROLL FOR NEXT