Varun Gandhi Remarks: अतिक अहमद हत्या प्रकरणानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
हिंदू-मुस्लिम राजकारणाबाबत वरुण यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. हिंदू-मुस्लिम राजकारण संपेल तेव्हाच देश मजबूत होईल, असे वरुण गांधी म्हणाले.
पण आज समाजाला घाबरवलं जातंय हे देशासाठी चांगलं नाही. मी सामान्य समाजाबद्दल बोलतोय, असेही ते म्हणाले.
वरुण गांधी पुढे म्हणाले की, 'हे सर्व तेव्हाच शक्य होईल, जेव्हा मुलांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळतील. मी जेव्हाही निवडणूक लढवली तेव्हा मी दारुचे वाटप केले नाही आणि पैसेही खर्च केले नाहीत.' वरुण गांधी एक दिवसापूर्वी दोन दिवसांच्या पिलीभीत दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात भाग घेतला आणि जनसंवाद कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
अतिक अहमदच्या हत्येनंतर यूपीमध्ये अलर्ट आहे. आजही मुख्यमंत्री योगी यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. अतिक हत्या प्रकरणानंतर प्रयागराजमध्ये (Prayagraj) अलर्ट आहे. संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे.
त्याचवेळी, उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन ही अद्याप फरार आहे. शाइस्ता अतिक-अश्रफ यांच्या अंत्यसंस्कारालाही हजर राहिली नाही. शाइस्ताने तिचा मुलगा असदच्या अंत्यसंस्कारालाही हजेरी लावली नाही.
तर दुसरीकडे, अतिक-अश्रफ यांच्या हत्येचा तपास करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.