Mohammed Waliullah Dainik Gomantak
देश

वाराणसी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी मोहम्मद वलीउल्लाला फाशीची शिक्षा

दहशतवादी मोहम्मद वलीउल्लाला (Mohammed Waliullah) सोमवारी गाझियाबाद न्यायालयाने एका प्रकरणात फाशी आणि दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमन्तक

वाराणसी साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी दहशतवादी मोहम्मद वलीउल्लाला सोमवारी गाझियाबाद न्यायालयाने एका प्रकरणात फाशी आणि दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 16 वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गाझियाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शनिवारी 4 जून रोजी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते. बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते, तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

दरम्यान, वाराणसीतील संकट मोचन मंदिर संकुलात झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी दहशतवादी वलीउल्लाह याला एका हत्येच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 26 जण जखमी आणि अपंग झाले होते. त्याचवेळी दशाश्वमेध घाटावर बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तसेच, वलीउल्लाला सोमवारी कडेकोट बंदोबस्तात जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशावरुन संपूर्ण न्यायालय संकुलाची सुरक्षा वाढवण्यात आली. बॉम्ब आणि श्वान पथकाकडून न्यायालयाच्या परिसरात कसून झडती घेण्यात आली.

काय प्रकरण आहे

7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाले होते. याशिवाय दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला होता. या बॉम्बस्फोटात अनेक जण ठार झाले होते. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबादमध्ये सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने जीआरपी कँट स्फोटात 53, संकट मोचन स्फोटात 52 आणि दशाश्वमेध घाट प्रकरणात 42 साक्षीदार हजर झाले.

वलीउल्ला हा प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावचा रहिवासी आहे

साखळी बॉम्बस्फोटांच्या संदर्भात, यूपी पोलिसांनी (Police) 5 एप्रिल 2006 रोजी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलिउल्लाला अटक केली. सबळ पुराव्यांसह, पोलिसांनी दावा केला की, संकट मोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशन, वाराणसी (Varanasi) येथे स्फोट घडवण्याच्या कटामागे वलीउल्लाचा हात होता. पोलिसांनी वलीउल्लाहचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचेही सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT