ज्ञानवापी प्रकरणः फेरसर्वेक्षणाच्या अर्जावर वाराणसी न्यायालयात उद्या होणार सुनावणी

ज्ञानवापी मशिदीच्या फेरसर्वेक्षणाच्या अर्जावर उद्या वाराणसी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Gyanavapi Masjid
Gyanavapi MasjidDainik Gomantak

ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanavapi Masjid) फेरसर्वेक्षणासाठी वाराणसी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. बुधवारी वाराणसी न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. खरे तर, मंगळवारी झालेल्या सुनावणीला वेगळे वळण लागले जेव्हा न्यायालयाने विशेष आयुक्तांवर माध्यमांमध्ये वक्तव्ये करणे आणि खासगी कॅमेरामन ठेवल्याच्या आरोपांची दखल घेत त्यांना हटविण्याचा निर्णय घेतला.

यासोबतच बनारस न्यायालयात शिवलिंगाचे मोजमाप आणि वजूखानाच्या सुविधांबाबत हिंदू आणि मुस्लिम पक्षांच्या स्वतंत्र याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार आहे. मुस्लीम पक्षाच्या वतीने न्यायालयात (Court) याचिका दाखल करण्यात आली असून त्यात वजूखाना परिसर सील करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाबाबत बोलले होते. मशिदीत येणाऱ्यांसाठी त्या छोट्या तलावातून टॉयलेट, पाण्याचे पाइप आणि मासे बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचवेळी हिंदू पक्षाने शिवलिंगाची उंची आणि लांबी मोजण्यासाठी याचिका केली होती. शिवलिंगाच्या मोजमापाच्या मुद्द्यावर मुस्लिम पक्षाकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. तर टॉयलेट आणि पाण्याचे पाइप इत्यादींबाबत हिंदू (Hindu) बाजूने हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Gyanavapi Masjid
ज्ञानवापी प्रकरणः न्यायालयाने अ‍ॅडव्होकेट कमिश्नर अजय मिश्रा यांना हटवलं

दुसरीकडे मात्र, अजय मिश्रा यांनी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी एका खासगी व्हिडिओग्राफरची नियुक्ती केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. ते या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर सतत माध्यमांमध्ये बोलत होते, असे सांगितले जात आहे. या कारणास्तव त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Gyanavapi Masjid
जगात अल्ल्हाच्या अस्तित्वापर्यंत ज्ञानवापी ही मशिदच राहणार; औवेसींचा दावा

याशिवाय, ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात, हिंदू पक्षाने वाजूखानाच्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. ही जागा सील करुन सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती, त्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले. मात्र, याप्रकरणी सातत्याने दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे मुस्लिम (Muslim) पक्षाचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, 'जिथे शिवलिंग असल्याचे सांगितले जात आहे, तो एक फक्त झरा आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com