Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
देश

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Hits 32 Ball Century: भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा आणि केवळ 14 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचं वादळ थांबायला तयार नाहीये.

Manish Jadhav

Vaibhav Suryavanshi Century: भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा आणि केवळ 14 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचं वादळ थांबायला तयार नाहीये. आयपीएलपासून प्रथम श्रेणी क्रिकेट आणि अंडर-19 स्तरावर गोलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या या फलंदाजाने त्याच्या टी-20 पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावून इतिहास रचला. कतारमध्ये 14 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या आशिया कप राइजिंग स्टार या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात, वैभवने संयुक्त अरब अमिराती विरुद्ध अवघ्या 32 चेंडूंत विस्फोटक शतक ठोकले.

पदार्पणातच गोलंदाजांची धुलाई

वैभव सूर्यवंशी, जो आतापर्यंत आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटशिवाय फक्त भारताच्या अंडर-19 संघात खेळत होता, त्याला पहिल्यांदाच जितेश शर्मा आणि नमन धीर यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या सीनियर लेव्हलच्या संघात संधी मिळाली. हा वैभवसाठी खास क्षण होता आणि त्याने पहिल्याच सामन्यात दाखवून दिले की, तो सीनियर स्तरावरही खेळण्यास पूर्णपणे सक्षम आहे. पहिल्यांदाच भारतासाठी टी-20 सामना खेळताना वैभवने आपले पदार्पण अविस्मरणीय शतकाने खास बनवले.

जीवदान आणि बाउंड्रीचा पाऊस

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यूएईच्या क्षेत्ररक्षकाने वैभवचा एक सोपा झेल सोडला आणि हे जीवदान यूएईच्या गोलंदाजांना खूप महागात पडले. यानंतर वैभवने यूएईच्या गोलंदाजांना कोणतीही दयामाया दाखवली नाही. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपासून ते चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर्यंत त्याने सामना केलेल्या सलग पाच चेंडूंवर त्याने सलग 5 बाउंड्री ठोकल्या. या युवा फलंदाजाने टीमला तुफानी सुरुवात करुन दिली. त्याने केवळ 17 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, पुढील 15 चेंडूंमध्ये त्याने उरलेले 50 धावा पूर्ण करुन आपले शतक झळकावले.

विक्रमी '144' धावांची खेळी

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच त्याला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने यूएईला पुन्हा एकदा धडा शिकवला. वैभवने 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारुन आपल्या टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी, त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी 34 चेंडूत शतक मारले होते. शतक पूर्ण करताना त्याने 10 चौकार आणि 9 षटकार जमा केले होते.

शतकानंतरही वैभव थांबला नाही. त्याने 11व्या षटकात सलग 4 षटकार आणि एक चौकार ठोकला. 12 षटकांच्या आत त्याने 138 धावा केल्या होत्या आणि तो द्विशतकाकडे वाटचाल करत होता. मात्र, 13व्या षटकात षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाउंड्रीवर झेलबाद झाला. तरीही या फलंदाजाने फक्त 42 चेंडूंमध्ये 144 धावांची हाहाकारी खेळी करुन सर्वांचे मनोरंजन केले. त्याच्या या झंझावाती खेळीत 15 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. याचा अर्थ, त्याच्या 144 धावांपैकी तब्बल 134 धावा त्याने फक्त बाउंड्रीजमधून मिळवल्या. त्याचा स्ट्राइक रेट 342.85 इतका विक्रमी राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President Goa Visit: भाजपचं 'यंग ब्रिगेड' मिशन! नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; राजकीय हालचालींना वेग

Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

Vasco Fish Market : 'पार्किंग व्यवस्थे'कडे होतेय दुर्लक्ष! वास्को नव्या 'मासळी मार्केट'कडे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Mangal Gochar 2026: ग्रहांच्या सेनापतीची 'विजया'कडे कूच! मंगळ बदलणार नक्षत्र, 'या' 3 राशींना होणार अफाट धनलाभ; कष्टाचेही होणार चीज

Goa Politics: भाजपकडून खोटे दावे करून मतदारांना वगळण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांचा आरोप

SCROLL FOR NEXT