Prime Minister Modi

 

Dainik Gomantak 

देश

'15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण होणार सुरु': पंतप्रधान मोदी

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटन धपमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

Manish Jadhav

देशात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट धूमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाराष्ट्राने नाईट कर्फ्यू लावला. नव वर्षासाठी काही दिवसच उरले असताना ओमिक्रॉनचं (Omicron variant) संकट देशावर घोंघाऊ लागलं आहे. त्यामुळे देशातील आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी आणि राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संक्रमण वाढू लागले आहे. नागरिकांनी सावध रहावे. कोरोना विषाणू म्युटेट होऊ लागल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. देशात 3000 हजार पेक्षा जास्त पीएसी ऑक्सिजन सेंटर काम करत आहेत. राज्यांना आवश्यक आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. मात्र घाबरुन न जाता सावधान आणि सतर्क रहावे लागणार आहे.'

पंतप्रधान पुढे म्हणाले, ''मास्कचा नियमित वापर नागरिकांनी करावा. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग दर्शवल्यामुळे लसीकरण मोहीम राबवणे सोपे झाले. लसीकरण कोरोना लढाईत आवश्यक आहे. गोवा, उत्तराखंड या पर्यटनामध्ये अग्रेसर असणाऱ्या राज्यांनी १०० टक्के लसीकरण पूर्ण केले.''

भारतात 141 कोटी वॅक्सीनचे डोस देण्यात आले आहे. देशात लवकरच नेझल आणि डीएनए लस देण्यास सुरुवात होणार आहे. देशातील 90 टक्के लोकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची चर्चा जगभरात वेगाने सुरु झाली आहे. भारतीय वैज्ञानिक सुध्दा या व्हेरिएंटवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना अद्याप गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे. 10 जानेवारीपासून 60 वर्ष वयोगटावरील नागरिकांना ऑक्सिजन डोस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस देण्यात येणार, असल्याचे देखील पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT