Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami

 

Twitter/@pushkardhami

देश

देश शोक व्यक्त करत असताना... उत्तराखंडचे मुख्यमंत्री गोवा काँग्रेसवर बरसले

स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला असे करताना लाज वाटायला पाहिजे.

दैनिक गोमन्तक

देहराडून: उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी रविवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat), त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या अकाली मृत्यूमुळे देश शोकग्रस्त होता आणि कॉंग्रेस पार्टी गोव्यात (Goa Congress) जोशात प्रचार करत होती असा आरोप त्यांनी केला.

"स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या या पक्षाला असे करताना लाज वाटायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे एकच पक्ष आणि एकाच कुटुंबाची सत्ता होती ज्यांनी नेहमीच तडजोड करत देशाशी खेळ केला, आज जेव्हा आपण सर्व आपल्या प्रिय, उत्तराखंडचा अभिमान, भारताचा अभिमान असलेल्या व्यक्तीच्या निधनाने दु:खी आहोत, तेव्हा काँग्रेस गोव्यात त्यांच्या निधनाचा आनंद साजरा करत होता नाचत होते,"असे धामी म्हणाले.

उत्तराखंड सरकारने तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आणि कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे पासिंग आऊट परेडही साधेपणाने पार पडली. पौडी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमादरम्यान धामी बोलत होते. दिवंगत जनरल रावत पौडीचे रहिवासी होते. यांनी विकसित उत्तराखंडचे स्वप्न पाहिले होते आणि आता त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडू नये, असे आवाहन धामी यांनी स्थानिक रहिवाशांना केली. धामी यांनी यावेळी जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

कॉंग्रेस सरचिटनिस प्रियांका गांधी मागील आठवड्यात गोवा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला. आणि गोव्यातील एका आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात आदिवासी कार्यक्रमात नृत्यही केले होते. त्याच्या या कृतीमुळे अनेकांनी त्यांच्या या नृत्याचा निशेध केला आणि त्यांच्यावर अनेक अरोपही केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'नवा फॉर्म्युला'! RGPने उघडले युतीचे दरवाजे; गोव्याच्या राजकारणात मोठा बदल?

Codar: 'पूर्वी खांडोळा गावात मोठी वनराई होती, ती कापून त्यावर शहर बनवले'; कोडार आणि आयआयटीचा गोंधळ

अग्रलेख: धारगळ की वन म्हावळिंगे? भिजत घोंगडे; वेर्ण्यात उभारलेले सुसज्ज क्रिकेट मैदान

Rajmata Jijabai Karandak: अखेरच्या 10 मिनिटांत 2 गोल! गोव्याच्या महिलांना पराभवाचा धक्का; 'देविका' छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार

Goa Ranji Cricket: गोव्याच्या मोहिमेला यंदा घरच्या मैदानावर आरंभ! चंदीगडसोबत रंगणार सामना; 15 ऑक्टोबरपासून थरार

SCROLL FOR NEXT