Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील लोहरपुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील लोहरपुरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या प्रेमीसोबत संसार थाटण्याच्या हव्यासापोटी एका 37 वर्षीय महिलेने आपल्या पतीची निर्घुण हत्या केली. रात्रीच्या वेळी आधी पतीला गुंगीचे औषध मिसळलेले कोल्ड ड्रिंक पाजले आणि त्यानंतर तो बेसावध झाल्यावर स्वतःच्याच साडीने त्याचा गळा आवळून त्याला संपवले. या थरारक घटनेनंतर आरोपी महिला फरार झाली होती, परंतु पोलिसांनी अवघ्या काही तासातच तिला ताब्यात घेतले. तिने आपल्या गुन्ह्याचीही कबुली दिली.

लोहरपुरी गावात राहणारे 42 वर्षीय उमाशंकर हे शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांनी ममता हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना 18 वर्षांचा मुलगा विकास आणि 12 वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ममता घरात कोल्ड ड्रिंक घेऊन आली होती. तिने मुलाला आणि मुलीलाही ते पिण्यास सांगितले, परंतु मुलांनी नकार दिला. त्यानंतर ती घराच्या छतावर गेली, जिथे उमाशंकर विश्रांती घेत होते. ममताने त्यांना ते नशायुक्त कोल्ड ड्रिंक पाजले आणि दोन्ही मुले खाली झोपायला निघून गेली.

रात्री उशिरा छतावरुन काही विचित्र आवाज आल्याने 12 वर्षांच्या मुलीला जाग आली. तिने भावाला उठवले आणि दोघेही छतावर गेले. तिथे त्यांची आई गायब होती आणि वडील उमाशंकर निपचित पडले होते. मुलांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्यांच्या गळ्याला साडी घट्ट गुंडाळलेली आढळली. घाबरलेल्या मुलांनी तात्काळ शेजाऱ्यांना बोलावले आणि मुलगा विकासने थेट पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.

घटना घडल्यानंतर पळून गेलेली आरोपी महिला घरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर लपलेली आढळली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, उमाशंकर कामानिमित्त गुजरातला (Gujrat) गेले असताना ममताच्या संपर्कात भावेश नावाचा एक युवक आला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यावरुन पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. जुलै महिन्यात उमाशंकर पत्नीला गावी घेऊन आले होते, परंतु ममता वारंवार प्रेमीकडे जाण्याचा तगादा लावत होती. याच वादातून आणि प्रेमीसोबत राहण्याच्या इच्छेतून तिने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT