uttar pradesh cm yogi resigns to governor new government can be formed before holi  Dainik Gomantak
देश

सीएम योगींनी राज्यपालांकडे दिला राजीनामा

पक्षाच्या बैठकीत नेता निवडीची औपचारिकता होणार पूर्ण

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवीन सरकार स्थापनेपूर्वीच्या प्रक्रियेनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. होळीपूर्वी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजप आघाडीला दणदणीत विजय मिळाला आहे. आता विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवडीची औपचारिकता पूर्ण होणार आहे. दिल्लीत अन्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, होळीपूर्वी योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, देशातील पाच राज्यातील निवडणूकांचा निकाल लागला आहे. पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांत भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला असून पाच राज्यापैकी ते प्रथम आपले सरकार स्थापन करणार आहे. तर दिल्ली नंतर पहिल्यांदाच देशात इतर राज्यात ही प्रथमच आपले सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तर आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री (CM) उमेदवार भगवंत मान हे 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT