Cyber Crime Dainik Gomantak
देश

Cyber Crime: 'दहशतवाद्यांना दीड कोटी पाठवले', एटीएस अधिकारी बनून सायबर ठगांनी साधला डाव; 'डिजिटल अरेस्ट'च्या प्रकारानं खळबळ

Bareilly Doctor Digital Arrest Scam Fake ATS Officers: उत्तर प्रदेशातील बरेली शहरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा वापरत एका डॉक्टरला गंडवण्याचा प्रयत्न केला.

Manish Jadhav

Bareilly Doctor Digital Arrest Scam Fake ATS Officers: उत्तर प्रदेशातील बरेली शहरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा वापरत एका डॉक्टरला गंडवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला दहशतवादविरोधी पथकाचे म्हणजेच एटीएसचे अधिकारी भासवून ठगांनी डॉक्टरांना रात्रभर व्हिडिओ कॉलवर ठेवले आणि अटकेची भीती दाखवली. या धक्कादायक प्रकारामुळे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर ठगांनी डॉक्टरशी संपर्क साधून त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. एका दहशतवादी संघटनेला दीड कोटी रुपये पाठवण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा वापर झाल्याचा दावा आरोपींनी केला. या कथित प्रकरणात अडकवण्याची भीती घालत ठगांनी डॉक्टरांवर प्रचंड मानसिक दबाव आणला आणि त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. त्यामुळे डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय रात्रभर तणावाखाली राहिले. मात्र, सकाळ होताच डॉक्टरांना या कॉलमधील विसंगती जाणवली आणि त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

तक्रार मिळताच होताच बरेली पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक तपासात एटीएस अधिकारी असल्याचे सांगून घाबरवणारे ते सायबर ठग असल्याचे स्पष्ट झाले. खरा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पोलिस, सीबीआय, ईडी किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवणे, गुन्ह्यात अडकल्याचा आरोप करणे आणि व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवून कोणालाही संपर्क साधू न देणे, याला 'डिजिटल अरेस्ट' म्हणतात. या मानसिक दडपणाखाली अनेक नागरिकांनी आपली आयुष्यभराची कमाई गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणतीही तपास यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलवर 'डिजिटल अरेस्ट' करत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा संशयास्पद कॉल्स आल्यास न घाबरता तत्काळ पोलिसांशी किंवा '1930' या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचे आरोप; चौकशी करा, काँग्रेसचे भाजपला चर्चेचे आव्हान

Goa Politics: राजकीय संन्यास सोडून मनोज परब पुन्हा मैदानात; 'आरजी'तील परब-बोरकर संघर्षाला नवे वळण

खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

Mexico Violence: ड्रग माफियाच्या अटकेनंतर रक्तरंजित धुमश्चक्री, अंदाधुंद फायरिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू; मेक्सिकोत गुन्हेगारी टोळीचा हैदोस!

Crime News: आसगाव प्रकरणाची पुनरावृत्ती? आश्वे-मांद्रेतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT