Uttar Pradesh Barabanki School Bus Accident Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: बाराबंकीत भीषण अपघात, स्कूल बस उलटल्याने 4 मुलांचा जागीच मृत्यू; 25 जणांची प्रकृती चिंताजनक

Uttar Pradesh Barabanki School Bus Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे भरधाव स्कूल बस उलटल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Barabanki School Bus Accident: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे भरधाव स्कूल बस उलटल्याची घटना समोर आली आहे. या बसमध्ये लहान मुले प्रवास करत होती, त्यापैकी 4 मुलांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात सुमारे 25 मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमी मुलांना स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लखनऊ प्राणीसंग्रहालयाला भेट देवून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मुलांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकीच्या देवा पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूरमध्ये हा अपघात झाला. बसमध्ये प्रवास करणारी सर्व मुले बाराबंकीच्या हरक्का गावातील कंपोझिट शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सर्व शाळकरी मुले शिक्षकांसह लखनऊला शैक्षणिक भेटीसाठी गेली होती. लखनऊहून परतत असताना हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले.

हरक्का कंपोझिट स्कूलच्या शिक्षकाने सांगितले की, ते सर्व मुलांसोबत शैक्षणिक भेटीसाठी लखनऊला गेले होते. मात्र, लखनऊहून परतत असताना त्यांच्या बसचा अपघात झाला. बसमधून सुमारे 40 मुलांसह 5 शिक्षक प्रवास करत होते. सध्या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चार मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील एका कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT