Use WhatsApp in your mother tongue

 

Dainik Gomantak

देश

आपल्या बोलीभाषेमध्ये करा WhatsAppचा वापर

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही दोन पद्धतीने भाषा बदलू शकता. पहिल्या पर्यायात तुम्ही संपूर्ण स्मार्टफोनची भाषा बदलू शकता. दुसऱ्या पर्यायात तुम्ही फक्त व्हॉट्सअ‍ॅपची भाषा बदलू शकता.

दैनिक गोमन्तक

मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतात (India) प्रत्येक राज्यात किंवा प्रदेशानुसार भाषा (Language) बदलते. हे अ‍ॅप ग्राहकांना प्रादेशिक भाषांमध्ये अनेक पर्याय ऑफर करते. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषांचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही दोन पद्धतीने भाषा बदलू शकता. पहिल्या पर्यायात तुम्ही संपूर्ण स्मार्टफोनची भाषा बदलू शकता. दुसऱ्या पर्यायात तुम्ही फक्त व्हॉट्सअ‍ॅपची भाषा बदलू शकता. यासाठी काही स्टेप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपोआप स्मार्टफोनच्या प्राथमिक भाषेशी कनेक्ट होते. त्यामुळे तुम्ही फोनची भाषा हिंदी, बंगाली, तामिळ किंवा इतर कोणत्याही भाषेत बदलत असाल तर व्हॉट्सअ‍ॅप आपोआप आपल्याला हव्या त्या भाषेत ऑपरेट करता येईल.

Android मोबाईलसाठी खास स्टेप्स

1) ओपन सेटींग्स- सिस्टीम- भाषा आणि इनपूट- भाषा (Open Settings → System → Language & input → Languages)

2) अॅड लॅंग्वेज वर क्लीक करून आपल्या आवडीची भाषा निवडा.

आयफोनसाठी (On iPhone)

1) आयफोन सेटींग- जनरल- भाषा आणि प्रदेश - भाषा (iPhone Settings →General → Language & Region → iPhone Language)

2) भाषा निवडा आणि भाषा चेंजवर क्लिक करा.

केआयओएससाठी (On KaiOS)

1) सेटींग- पर्सनालायजेशन करण्यासाठी स्क्रोल करा- खाली स्क्रोल करून भाषा निवडा( Settings → scroll to the side to choose Personalisation →scroll down and choose Language)ट

2) तुमच्या आवडीची भाषा निवडून ओकेवर क्लिक करा

हे सर्व करत असताना तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटींगवर जाऊन टॅप ऑन चॅटींग- वर क्लिक करून अ‍ॅपची भाषा सिलेक्ट करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT