S. Jaishankar
S. Jaishankar Dainik Gomantak
देश

अमेरिकेने उपस्थित केला भारतीय मानवाधिकारांवर प्रश्न, परराष्ट्रमंत्री म्हटले...

दैनिक गोमन्तक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की या आठवड्यात भारत-अमेरिका (India-America) 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीत मानवी हक्कांचा मुद्दा हा चर्चेचा विषय नव्हताच. तथापि, जेव्हाही चर्चा होईल तेव्हा नवी दिल्लीत बोलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठामपणे सांगितले आहे. (US raises questions on Indian human rights)

कठोर भूमिका घेत, जयशंकर म्हणाले की लोकांना भारताबद्दल मत ठेवण्याचा अधिकार आहे आणि ते पुढे म्हणाले की, "अमेरिकेतील मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल आमचीही वैयक्तिक मते आहेत." भारतातील मानवी हक्कांवर अमेरिकेच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, लोकांना भारताबद्दल मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे.

लॉबी आणि व्होट बँक अशी टीका करत असतात, असंही ते म्हणाले. जयशंकर म्हणाले की, 'लोकांना आमच्याबद्दल मत मांडण्याचा पुर्णपणे अधिकार आहे. परंतु, लॉबी आणि व्होटबँकेद्वारे चालना देणारी त्यांची मते आणि हितसंबंधांचा विचार करण्याचाही आम्हाला पुर्ण अधिकार आहे.

याआधी सोमवारी, संयुक्त पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन म्हणाले की, भारतामध्ये काही सरकार, पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून वाढत्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांसह भारतातील काही चिंताजनक घडामोडी अमेरिका (America) लांबून पाहत आहे. जेव्हा त्यांनी हे सांगितले तेव्हा 2+2 संवादानंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेला ब्लिंकन, जयशंकर, सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी संबोधित केले आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, मानवाधिकाराच्या मुद्द्यावर सध्याच्या बैठकीत तरी चर्चा झाली नाहीये, यापूर्वीही यावर चर्चा झाली. ते म्हणाले, 'हा विषय यापूर्वीही उद्भवला होता. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन भारत दौऱ्यावर आल्यावर ही बाब समोर आली आहे. मला वाटतं की तुम्हाला त्यानंतरची पत्रकार परिषद आठवत असेल तर, आम्ही या विषयावर चर्चा केली याबद्दल मी खूप बोललो होतो आणि मला जे म्हणायचे आहे ते मी सांगितले आहे.

जयशंकर म्हणाले, “मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही अमेरिकेसह इतरांच्या मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दलही आमचे मत मांडत असतो. म्हणून जेव्हा आम्ही या देशात मानवी हक्कांचे प्रश्न मांडतो, विशेषत: जेव्हा ते आमच्या समुदायाशी संबंधित असतात आणि खरे तर, काल आमच्याकडे अशीच एक केस होती असंही यावेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT