UPSC Recruitment 2022: Apply today for recruitment in various departments Dainik Gomantak
देश

UPSC Recruitment 2022: विविध विभागांमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

आज 27 जानेवारी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) करण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

दैनिक गोमन्तक

आज 27 जानेवारी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) करण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ आणि कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक यासह अनेक रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत.

रिक्त पदांची संख्या 78 आहे. तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या. रिक्त पदांसाठीच्या अर्जांसाठी विविध शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली असून या सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी परिक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना वाचूनच उमेदवारांनी अर्ज भरावे.

प्रत्येक उमेदवारांना अर्ज फी 25 रुपये भरावे लागतील. कोणत्याही SBI शाखेत रोख, नेट बँकिंग किंवा व्हिसा/मास्टरक्रेडिट/डेबिट वापरून ही फी भरता येणार आहे.

कोणत्या जागांसाठी होणार भरती

कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक- 36 जागा

सहाय्यक संपादक-(Cost)- 16

सहायक प्राध्यापक- 7

रसायनशास्त्रज्ञ- 5

व्याख्याता- 4

इकोनॉमिक ऑफिसर- 4

वैज्ञानिक- 2

सहायक संपादक- (Oriya)-1

प्रशासकीय अधिकारी- 1

मॅकेनिकल मरीन इंजीनियर- 1

संशोधन अधिकारी - 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT