UPSC CSE Final Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 (UPSC Civil Services Result 2022) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात.
एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. इशिता किशोरने UPSC परीक्षेत मध्ये टॉप केले आहे. गरिमा लोहिया द्वितीय तर उमा हर्ती एन तृतीय क्रमांकावर आहे. चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा गहना नव्या जेम्सने मिळवला.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत चालल्या.
30 जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरु झाली. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत, UPSC ने IAS, IPS सह सेवांमध्ये 1011 पदांची भरती केली होती.
UPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट 'A' आणि गट 'B' मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत.
933 यशस्वी उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 SC, 72 ST प्रवर्गातील आहेत. या परीक्षेद्वारे IAS 180, IFS 38, IPS 200, केंद्रीय सेवा गट 'A' साठी 473 आणि गट 'B' सेवांसाठी 131 जागा भरल्या जातात.
UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या UPSC 2022 अंतिम निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
आता रोल नंबरच्या मदतीने तपासा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.