Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Mallkikarjun Kharge: मल्लिकार्जून खरगे यांनी भर संसदेत 'कुत्रा' म्हटल्याने गदारोळ!

भाजपच्या टीकेनंतरही खरगे मात्र स्वतःच्या शब्दांवर ठाम

Akshay Nirmale

Mallkikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी हिवाळी अधिवेशनात संसदेत केलेल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. भाजप खासदारांसह मंत्र्यांनी खरगे यांच्यावर या वक्तव्यारून टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भाजपबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना म्हटले की, स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपले बलिदान दिले, पण भाजपवाल्यांच्या घरातून स्वातंत्र्याच्या लढ्यात एक कुत्राही मेला नाही. आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले, पण तुम्ही काय केले?

दरम्यान, या वक्तव्यानंतर भाजपकडून खरगेंवर तीव्र टीका केली जात आहे. आणि या टीकेनंतही, मी माझ्या शब्दांवर ठाम असल्याचे काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. भाजपने खर्गे यांनी माफी मागावी अशी मागणी राज्यसभेत केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल म्हणाले की, खर्गे यांनी असभ्य भाषा वापरली आहे. त्यांच्या असभ्य भाषणाचा मी तीव्र निषेध करतो. खर्गे यांनी माफी मागावी. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही डुप्लिकेट काँग्रेस असल्याचे सांगितले. बनावट काँग्रेस. ही सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी यांची काँग्रेस नाही.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे इतकी खालच्या पातळीची आक्षेपार्ह टिप्पणी करू शकतात यावर माझा विश्वास बसत नाही. राजकीय पक्षाचा नेता म्हणून त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही शत्रू नाही, प्रतिस्पर्धी आहोत. हे अप्रिय, दुर्दैवी आणि अनावश्यक आहे. तर भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले की, खर्गे साहेबांचा पक्ष सर्वांना कुत्रा मानतो. माझे आजोबा जवळपास 5 वर्षे तुरुंगात होते आणि काँग्रेसमध्ये होते. आजपर्यंत काँग्रेसने सर्वांना कुत्राच मानले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT