UP Police Video
देश

UP: 12 तासांच्या कामानंतर मिळते निकृष्ट दर्जाचे जेवण, पोलीस कर्मचाऱ्याने रडत व्यक्त केली व्यथा

यूपी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाविरोधात एका पोलीस हवालदाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दैनिक गोमन्तक

UP Police Mess: यूपी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाविरोधात एका पोलीस हवालदाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी रडतांना दिसत आहे. "जे अन्न दिले जात आहे ते असे आहे की प्राणी देखील खाऊ शकत नाही, परंतु आम्हाला खायला दिले जाते. हा वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि डीसीपी यांनी केलेला घोटाळा आहे. या लोकांच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचे अन्न पोलीस कर्मचाऱ्यांना पुरवले जाते." अशी तक्रार करत पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यथा त्याने व्यक्त केली आहे. या संपुर्ण प्रकरणानंतर पोलीस मेस मॅनेजरने, कुमार अन्नाच्या दर्जाबाबत अनावश्यक गोंधळ घालत आहे, असे म्हणत कुमारच्या बोलण्यात तथ्य नसल्याचे सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलीस कर्मचाऱ्यांना मेसमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण मिळत असल्याचे उत्तर प्रदेश सरकार लाखो दावे करत असले तरी, फिरोजाबादच्या पोलीस लाईनमधील हवालदार मनोज कुमार यांनी या गोष्टी पोकळ असल्याचे दाखवून दिले आहे. मेसमध्ये चांगले जेवण मिळत नसल्याची तक्रार मनोजने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून हातात ताट घेवून त्याच चपाती, डाळ आणि भात घेऊन तो रस्त्यावर आला. आणि रडत आपल्या जेवणाची व्यथा सांगितली.

याबाबत फिरोजाबाद पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, 'मेसच्या जेवणाच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारीत, सीओ सिटी ट्विट प्रकरणात अन्नाच्या गुणवत्तेची चौकशी करत आहे. या तक्रारदार हवालदाराला मागील काही वर्षात अनुशासनहीनता, गैरहजर राहणे आणि निष्काळजीपणा यासंबंधी 15 शिक्षा देण्यात आल्याने त्याने हा गोंधळ घातला आहे.' दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा जेवणाच्या दर्जाविरोधात आंदोलन करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेले आश्वासन खोटे असून निकृष्ट दर्जाचे अन्न पोलिसांना दिले जात आहे असे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी पोलिसांच्या भत्त्यात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री योगी यांनी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT