Voting DainiK Gomantak
देश

UP Election 2023: 'तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला वर्षभरासाठी...', उमेदवारानं लढवली अनोखी शक्कल!

UP Election 2023: सर्वच पक्षांचे नेते आणि उमेदवार विविध स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने देत आहेत.

Manish Jadhav

UP Election 2023: उत्तर प्रदेशमध्ये नागरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्याचवेळी 11 मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

सर्वच पक्षांचे नेते आणि उमेदवार विविध स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने देत आहेत. या निवडणुकीत काही नेत्यांच्या घोषणा मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, एका उमेदवाराने सांगितले की, 'जे मला मतदान करतील त्यांना वर्षभरासाठी फोन रिचार्ज करुन दिला जाईल.' ते पुढे म्हणाले की, 'रिचार्ज करण्यासाठी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. आपल्या मतदारसंघात राहणारा कोणताही व्यक्ती अल्लाह किंवा देवाला साक्षी मानून मला मत देईल, त्याला मी वर्षभरासाठी फोन रिचार्ज करुन देईन.'

दुसरीकडे, मेरठच्या (Meerut) नगर पंचायत सिवाल खासच्या अपक्ष उमेदवाराने केलेली ही घोषणा आचारसंहितेचा भंग मानली जात आहे. यावर पोलीस कारवाई करु शकतात. तथापि, उमेदवाराच्या आश्वासनाशी संबंधित कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही किंवा त्याबद्दल कोणी तक्रारही केलेली नाही. मात्र वचनपूर्ती रंजक असल्याने त्याची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे.

तसेच, पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिस अधिकारी राजेश कंबोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. कोणतीही तक्रार आल्यास पोलिस पथक त्याची चौकशी करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT