Union Finance Minister Nirmala Sitharaman's candidature for Rajya Sabha Dainik Gomantak
देश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल

10 जून रोजी होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

भाजप नेतृत्वाने रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते-राजकारणी जगेश यांना 10 जून रोजी होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधून उमेदवारी दाखल केली.

(Union Finance Minister Nirmala Sitharaman's candidature for Rajya Sabha)

सीतारामन यांना कर्नाटकातील उमेदवारांना जागा देण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना ही घोषणा करण्यात आली होती. घोषणेपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, कर्नाटकातील चार जागांपैकी तीन जागा मिळवण्यासाठी चर्चा झाली.

भजप पक्षाने विधानसभेतील आपल्या संख्येनुसार चार जागांसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेस येत्या काही दिवसांत उमेदवार जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. तथापि, शेवटच्या जागेवर अनिश्चितता कायम राहिली कारण विधानसभेत कोणत्याही पक्षाकडे दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची ताकद नव्हती. पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, पक्षाला तिसऱ्या जागेसाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. "तिसरी जागा कशी मिळवायची यावर चर्चा झाली," बोम्मई म्हणाले. निवडणुकीपूर्वी दोन पक्षांनी हातमिळवणी केली तरच तिसरा उमेदवार निवडणे शक्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. "कोण कोणाशी चर्चा करणार हे आम्ही पाहू. अद्याप काहीही निश्चित झालेले नाही," ते म्हणाले, राज्य नेतृत्वाने या घडामोडी पक्षाच्या वरिष्ठांना कळवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT