Union Budget 2023 Live Blog Dainik Gomantak
देश

Union Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पात 'या' गोष्टींवर भर... अर्थमंत्र्यांच्या सर्व घोषणा वाचा एका क्लिकवर

देशाचा 75 वा तर अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचा पाचवा अर्थसंकल्प

Akshay Nirmale

शेअर मार्केटमध्ये उसळी

निर्मला सीतारामन यांच्या घोषणांचा आनंद गुंतवणूकदारांनी साजरा केल्याचे दिसून येत आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढून 60,500 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टी 258 अंकांनी वधारला असून 17,920 वर गेला आहे.

Union Budget 2023 Live Blog

असा असेल टॅक्स स्लॅब

Union Budget 2023 Live Blog

काय स्वस्त, काय महाग ?

Union Budget 2023 Live Blog

मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहे तर सोने-चांदी, सिगारेट महागणार आहे.

७ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट 

अर्थमंत्री सीतारामन यांनी मध्यवर्गियांना गुड न्यूज दिली आहे. आत्तापर्यंत ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. आता ही मर्यादा दोन लाखांनी वाढवली आहे. म्हणजेच आता ७ लाखांच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स नसेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. सरकारने नवीन कर प्रणाली अंतर्गत सर्वोच्च अधिभार दर 37 % वरून 25 % पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, टॅक्स पोर्टलवर दररोज 72 लाख अर्ज येतात. यामध्ये आम्ही आणखी सुधारणा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. टॅक्स रिटर्नची प्रक्रिया 90 दिवसांवरून 16 दिवसांवर आणण्यात आली असून एका दिवसात 72 लाख टॅक्स रिटर्न भरण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. करदात्यांच्या तक्रार निवारणात सुधारणा झाली आहे आणि सामान्य आयटी रिटर्न फॉर्ममुळे रिटर्न भरणे सोपे होईल.

सिगारेट आणखी महाग होणार

Union Budget 2023 Live Blog

नियमित कर भरणाऱ्यांच्या करात कपात करणार

Union Budget 2023 Live Blog

अनेक वस्तुंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा

मोबाईल आणि इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार 

बॅटरीवर चालणाऱ्या आणि इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार

डिजिटल भारत

डिजिटल NATION वर लक्ष केंद्रित करणे सुरू आहे; डिजीलॉकर आणि आधारचा वापर सध्याच्या KYC अडथळ्यांना सुलभ करेल

Union Budget 2023 Live Blog

८० कोटी नागरिकांना मोफत रेशन

100 नवीन प्रयोगशाळा उभारणार

5G सेवा वापरून अॅप्स विकसित करण्यासाठी 100 प्रयोगशाळा अभियांत्रिकी संस्थांमध्ये स्थापन केल्या जातील. संधींची नवीन श्रेणी, व्यवसाय मॉडेल आणि रोजगाराची क्षमता लक्षात घेण्यासाठी, प्रयोगशाळा स्मार्ट क्लासरूम्स, प्रिसिजन फार्मिंग, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स आणि हेल्थकेअर सारख्या अॅप्सचा वापर करण्यात येईल.

Union Budget 2023 Live Blog

वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी ७५ हजार कोटी

Union Budget 2023 Live Blog
Union Budget 2023 Live Blog

पीएम आवास योजना 

पीएम आवास योजनेच्या वाटपात 64 % वाढ. 79,000 कोटी रुपयांवर.

गटारांची सफाई आता मॅनहोल्स मशिनद्वारे 

महिला सन्मान सेवा बचत पत्र

महिलांसाठी दोन वर्षांसाठी योजना. दोन लाखांपर्यंतची रक्कम यात ठेवता येईल. यात ७ टक्के व्याज मिळेल. महिला बचत योजनेत दोन लाखांपर्यंत गुंतवणुकीची सूट.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी पॅकेज विकसित करणार. ५० टुरिस्ट डेन्स्टिनेशन विकसित करणार.

लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी ९ हजार कोटींची क्रेडिट गॅरंटी

सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी दोन हजार कोटींचे कर्जवाटप केले.

व्हायब्रंट व्हिलेज योजना 

देखो इंडिया, स्वदेस योजन, व्हायब्रंट व्हिलेज योजनेतून पर्यटनासह विकास.

अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर यावर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पशुपालक आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने अनेक पावले उचलली आहेत.

देशात २०० बायोगॅस प्लँट उभारणार 

गोवर्धन योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद.

देशात ३० स्कील इंडिया सेंटर्स उभारणार

देशात ३० लाख स्कील इंडिया सेंटर्स उभारणार असून त्यातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मिशन कर्मयोगी अंतर्गत केंद्र आणि राज्ये एकत्रितपणे ऑनलाइन प्रशिक्षण मंच सुरू करतील. सरकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवून कृत्रिम बुद्धिमत्तेची तीन केंद्रे स्थापन करून त्यांच्यामार्फत संशोधन केले जाणार आहे. आरोग्य, कृषी यांसारख्या क्षेत्रातील समस्या दूर करण्यावर चर्चा होईल.

कृषी कर्जाचे लक्ष २० लाख कोटींपर्यंत वाढवणार

व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी निधीची तरतूद 

प्रदुषण करणाऱ्या जुन्या वाहनांना स्क्रॅपमध्ये काढण्यासाठीची योजना सुरू ठेवली जाईल. त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. राज्यांनाही त्यासाठी सहकार्य केंद्र सरकार सहकार्य करेल.

खारफुटी संवर्धनाचा प्रयत्न 

हरित विकासावर केंद्र सरकारचा भर. खारफुटी (मँग्रुव्हज) संवर्धनाचा सरकारचा प्रयत्न आहे.

२०३० पर्यंत ५ मेट्रिक टन हायड्रोजन उत्पादनाचे लक्ष्य 

अलीकडेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन लाँच केले आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे नेतृत्व करण्याचे लक्ष्य आहे.

उर्जा विभागासाठी ५० हजार कोटींची तरतूद 

ई कोर्टसाठी ७० हजार कोटींची तरतूद 

२०७० सालापर्यंत कार्बनमुक्तीचे लक्ष्य 

कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर असून २०७० पर्यंत कार्बनमुक्तीचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करत आणणार. पर्यावरणपुरक विकासासाठी रिन्युएबल एनर्जीला प्राधान्य. लडाखमध्ये असा एक प्रोजेक्ट करणार.

व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्ड 

आर्टीफिशियल इंटेलिजन्ससाठी तीन केंद्रे बनवणार 

नॅशनल डाटा पॉलिसी आणणार

१ लाख पुरातन लेखांचे डिजिटलायझेशन 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख पुरातन पुरावे डिजिटल केले जातील.

सहकारी बँकांचे संगणकीकरण करणार

नवी ५० विमानतळे सुरू करणार 

बजेट मध्ये सात गोष्टींवर भर   

- Inclusive development

- Reaching the last mile

- Infra & investment

- Unleashing the potential

- Green growth

- Youth

- Financial sector

बजेटमध्ये या सात गोष्टींवर भर असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

रेल्वेसाठी २.४ लाख कोटींची तरतूद 

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपये दिले जात आहेत, हे रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे. 2014 मध्ये दिलेल्या अर्थसंकल्पीय वाटपाच्या तुलनेत हे प्रमाण 9 पट अधिक आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स स्थापन करणार 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येईल. भारत @100 च्या माध्यमातून देश जगभरात मजबूत होईल. ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान, हस्तकला आणि व्यापारात काम करणाऱ्या लोकांनी कला आणि हस्तकलेमध्ये योगदान देण्यात येईल. जे स्वावलंबी भारतासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. याद्वारे केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे; आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल.

पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रूपये खर्च करणार

पायाभूत सुविधांच्या खर्चात ३३ टक्के वाढ करणार.

गरीब कैद्यांच्या जामिनासाठी आर्थिक सहाय्य करणार 

शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालय सुरू करणार 

एकल्व्य शाळांमधून ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती करणार 

पुढील तीन वर्षांत सरकार आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल स्कूलसाठी 38,80 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल. आदिवासी बांधवांसाठी शाळा सुरू करणार.

१५७ नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार

देशात १५७ नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार असल्याची घोषणा सीतारामना यांनी केली.

६ हजार कोटींची पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना

मत्ससंपदेसाठी ६ हजार कोटींची नवीन योजना आणणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. सहकारासाठी नवीन मंत्रालय स्थापन करण्यात आले.

डाळींसाठी विशेष हब 

डाळीसाठी विशेष हब बनविण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.

कृषीपुरक स्टार्टअपसाठी निधी 

शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी कृषीपुरक स्टार्टअपसाठी फंड निर्माण केला जाईल. कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न.

रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर

चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रोजगाराच्या संधी वाढवता येतील यावर सरकारचा विशेष भर आहे. भारताला G20 अध्यक्षपद ही एक मोठी संधी आहे आणि ती भारताची ताकद दर्शवते.

पर्यटनाला चालना देणार, ग्रीन ग्रोथचे लक्ष्य 

सीतारामन म्हणाल्या की, राज्यांच्या सहभागातून पर्यटनाला चालना देणार. ग्रीन ग्रोथ हे देशाचे लक्ष्य आहे. यात पर्यावरणपूरक विकासावर भर दिला जाणार आहे. गरीबांना एक वर्ष मोफत धान्य दिले जाईल.

102 कोटी नागरिकांचे कोविड लसीकरण 

देशात नव्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. लाभार्थ्यांच्या हातात थेट पैसे दिले. जगातल्या मोठ्या देशांनी कोविड व्यवस्थापनाबद्दल भारताचे कौतूक केले. भारताने 102 कोटी नागरिकांना कोविड लसीकरण केले आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात केली आहे. यूपीआय ृ, कोविन अॅपमुळे जगाने भारताचे महदत्व मान्य केले. त्यामुळेच भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे.

अर्थसंकल्पाला मंत्रीमंडळाची औपचारिक मंजुरी

संसद भवनात केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देण्यात आली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. चांगला अर्थसंकल्प येत आहे, असा विश्वास यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्री सीतारामन राष्ट्रपतींची भेट

बुधवारी सकाळी 8:30 अर्थ मंत्री निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयात आल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसह राष्ट्रपती भवन गाठले. तिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बजेटसाठी मंजुरी घेतली. . सकाळी ९ वाजता सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजासह प्रसारमाध्यमांसमोर पोज दिली. हा अर्थसंकल्प सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून पाचवा अर्थसंकल्प असून देशाचा 75 वा अर्थसंकल्प असणार आहे. दरम्यान, अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी सकाळी मंदिरात पुजा केली.

Union Budget 2023 Live Blog

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT