केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर Dainik Gomantak
देश

Farmers Protest: "मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार"

शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरु झाल्यापासून शेतकरी आणि आंदोलक यांच्यात चर्चेच्या अनेत फेऱ्या होऊन सुद्दा तोडगा निघू शकलेला नाही.

Sudhir Kakde

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लागु केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 7 महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपपासुन दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र चर्चेतुन शेतकऱ्यांचे समाधान होत नसल्याने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यातच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.(Union Agriculture Minister Narendra Singh Tomar has said that the Modi government is ready to hold discussions with farmers)

आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, शेतऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे नरेंद्र तोमर यांच्य़ाकडुन सांगण्यात आले आहे. “शेतकऱ्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपले आंदोलन संपवावे. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे” असे ट्विट नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे. तसेच पुढे ते असेही म्हणाले की, “APMC अर्थाक बाजार समित्यांना मजबुत केले जाईल.”

दरम्यान, केद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा बैठका झाल्या आहेत. शेतकरी आंदोलनातील शेतकरी रोज वेगवेगळ्या पद्धतिने निदर्शने करत आहेत. तर केंद्र सरकारने लागु केलेले तीन्ही कायदे थेट रद्द करावे हीच मागणी असल्याने इतर कुठल्याही चर्चेत आंदोलक शेतकऱ्यांना रस नसल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे आता कृषी मंत्र्यांनी केलेल्या या आवाहनाला शेतऱ्यांकडुन कसा प्रतिसाद मिळतो हे आता पहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT