Crime Dainik Gomantak
देश

Unemployed Son Killed Mother : आधी नोकरी मगच छोकरी; क्षुल्लक कारणावरुन मुलाने आईलाच संपवलं

मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Unemployed Son Killed Mother : नोकरी लागण्यापूर्वी लग्न करण्यास विरोध केल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलगा हा बेरोजगार होता, मात्र लग्नासाठी त्याची घाई सुरु होती, अशी माहिती आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळ शहरातील एका 32 वर्षीय तरुणाने आपल्या 67 वर्षीय आईची हत्या केली. कारण फक्त इतकंच होतं की आईने त्याला आधी नोकरी मिळव मग लग्न कर असा सल्ला दिला होता. याच गोष्टीचा राग मनात धरुन माथेफिरु मुलाने आईचा जीव घेतला. आसमा फारुख असं या दुर्दैवी आईचं नाव असून ती आपल्या अताहउल्ला आणि आरोपी फरहान या दोन मुलांसह राहात होती. आरोपी फरहान हा बीकॉम झालेला असून बेरोजगार होता. मंगळवारी जेव्हा अताहउल्ला घरी आला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात सापडली. त्याने तातडीने आईला रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. डॉक्टरांनी आस्मा फारुख यांना मृत घोषित केलं.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अताहउल्लाने फरहानला रक्ताने माखलेली क्रिकेटची बॅट लपवताना पाहिलं. जेव्हा भावाने आरोपीला विचारलं तेव्हा त्याने आधी टाळाटाळ केली. आधी आई टेरेसवर पडल्याचा बनाव करणाऱ्या फरहानने नंतर आपणच आईची हत्या केल्याचं कबूल केलं. पोलिसांना याची माहिती दिल्यास तुलाही जीवे मारेन अशी धमकी आरोपीने आपल्या भावाला दिली. दरम्यान जेव्हा पोलिसांनी दोघाही भावांची चौकशी केली, त्यावेळी गोंधळलेल्या फरहानला पाहून पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी फरहानने आपणच हत्या केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी आरोपी फरहानला अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT