Bribe Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: माणुसकीला काळीमा! 'ती' रस्त्यावरच झाली बाळंतिण, 1000 साठी रुग्णालयात नाकारला प्रवेश

सुमन देवी या महिलेच्या मदतीला रस्त्यावरून जाणाऱ्यांसह अनेक महिला धावून आल्या आणि तिला साडीने झाकले, त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.

Manish Jadhav

Uttar Pradesh News : अलिगड जिल्हातील इग्लास गावातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. सरकारी रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी एक हजार रुपये नाकारल्याने मजुराच्या गरोदर पत्नीने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.

यावेळी सुमन देवी या महिलेच्या मदतीला रस्त्यावरून जाणाऱ्यांसह अनेक महिला धावून आल्या आणि तिला साडीने झाकले, त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पीडित महिलेचा (Women) पती बबलू सिंग याने पत्नीला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 1000 रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

तो म्हणाला, "आम्ही शुक्रवारी दुपारी डॉक्टरांना भेटण्यासाठी रुग्णालयात आलो होतो. कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे लाच मागितली. मी त्यांना माझ्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. तिला खूप वेदना होत होत्या आणि त्यानंतर, तिची प्रसूती रस्त्यातच झाली."

तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर आणि परिसरात लोक जमा होऊ लागले, कर्मचार्‍यांनी तिला जिल्हा रुग्णालयात हलवले, तेथून तिला "पुढील वैद्यकीय लक्ष" साठी अलीगढमधील जेएन वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.

इग्लास रुग्णालयाचे (Hospital) प्रभारी रोहित भाटी यांनी सांगितले, "सध्या तपास सुरू आहे. जिल्हा मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली.

परिचारिकांचे जबाब तपास पथकाने नोंदवले आहेत. महिलेवर सध्या योग्य उपचार सुरू आहेत आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे.

यापूर्वी, जानेवारीमध्ये एका 30 वर्षांच्या महिलेला हातरस जिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या मैदानात तिच्या बाळाची प्रसूती करण्यास भाग पाडले होते. त्या महिलेकडे रक्ताचा अहवाल नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तिला प्रवेश नाकारला होता.

गेल्या काही वर्षांत खासकरुन उत्तरेकडील राज्यांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शोषित वर्गाला जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT