Biparjoy Cyclone Dainik Gomantak
देश

Biparjoy Cyclone! ही, विनाशाची सुरुवात तर नाही ना? यूएन, आयआयटी बॉम्बे आणि मद्रासने समोर आणली चक्रीवादळामागची कारणे

महासागर आधीच उष्ण झाले आहेत. मार्चपासून अरबी समुद्राचे तापमान सुमारे 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे.

Ashutosh Masgaunde

या वर्षी अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले वादळ बिपरजॉयचे वेगाने तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. बिपरजॉय गुजरातजवळ आग्नेय अरबी समुद्रात पोहोचणार आहे. वादळामुळे 15 जून रोजी वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

अशात संयुक्त राष्ट्रांचा हवामान विभाग, आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी मद्रासने बिपरजॉय चक्रीवादळामागची कारणे समोर आणली आहेत. ही कारणे गंभीर असल्याने यावर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय सांगतो?

उष्ण हवामानात उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची तीव्रता वाढेल, असे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान अहवालात यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलाच्या युगात वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ तर होणारच आहे, यासोबत ते टाळताही येणार नाहीत.

IIT Bombay, IIT Madras च्या अहवालात दडलेय काय आहे?

आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासानुसार, "हवामानातील बदलामुळे जागतिक तापमानवाढ झाली आहे. यामुळे महासागर आधीच उष्ण झाले आहेत. मार्चपासून अरबी समुद्राचे तापमान सुमारे 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे.

IIT मद्रासच्या अभ्यासात चक्रीवादळाच्या तीव्रतेचा ग्लोबल वार्मिंगशी संबंध असल्याचे सांगितले आहे. या अभ्यासात म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळे तीव्र होत आहेत.

पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या 2019 च्या अहवालात असे आढळून आले आहे की 1950 च्या दशकानंतर हिंद महासागराने समुद्राच्या पृष्ठभागाची सर्वात जलद तापमानवाढ अनुभवली आहे.

Timeline of Biparjoy Cyclone

चक्रीवादळ बिपरजॉय हे अलीकडच्या काळातील सर्वात जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. 6 दिवसांपूर्वी उठलेले हे वादळ अद्याप शांत झालेले नाही. ते 10 दिवस टिकेल असा अंदाज आहे.

10 जून रोजी, दुपारी 2.30 वाजता, IMD ने इशारा दिला की चक्रीवादळ अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. आणि त्यांचा हा अंदाज अचूक होता.

11 जून 2023 पर्यंत बिपरजॉय वादळ हे एक चक्रीवादळ मानले जात होते. त्यानंतर त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. वाऱ्याचा वेग 168-221 किलोमीटर प्रतितास (किमी प्रतितास) पर्यंत पोहोचतो तेव्हा अत्यंत तीव्र चक्रीवादळ तयार होतात.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 12 जून रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग 165-175 ते 190 किमी प्रतितास होता.

हे वादळ १५ जूनला दुपारी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकणार आहे. या वादळाच्या धडकेमुळे 150 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वादळामुळे गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात विजांचा कडकडाट सुरू आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे चक्रीवादळ 16 जूनला राजस्थानला पोहोचण्याची शक्यता आहे. IMD च्या मते, वाऱ्याचा कमाल वेग 125-135 kmph ते 150 kmph असू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मंगळवारी वादळ काहीसे कमकुवत झाले असले तरी ते अजूनही धोकादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT