PM Rishi Sunak Dainik Gomantak
देश

UK PM Rishi Sunak: ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदीराला भेट; पाहा व्हिडिओ

UK PM Rishi Sunak: त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे खादीवस्र देऊन स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

UK PM Rishi Sunak: भारतात G20 शिखर परिषदेनिमित्त विविध देशांचे राष्ट्रप्रमुख हजर झाले आहेत. जगभरातील १९ देश आणि युरोपिय संघटनेचा G20 मध्ये समावेश आहे. यावर्षी भारताकडे G20 चे अध्यक्षपद असल्याने भारताच्या विविध राज्यात याआधीदेखील परिषदा पार पाडल्या आहेत.

सध्या ही मीटींग दिल्लीमध्ये पार पडत आहे. या सगळ्यात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची चर्चा सुरु आहे. त्यांनी शिखर परिषदेदरम्यान, अक्षरधाम मंदीराची सपत्नीक भेट घेतली आहे. त्यांनी या मंदीरात पूजा अर्चादेखील केली आहे.

यावेळचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी याला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे सोशल मिडियावर दिसत आहे. ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यापासूनच भारतात त्यांची चर्चा आहे. ते प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. त्यामुळे त्यांना भारताचे जावई असेही म्हटले जाते.

दरम्यान, आज या G20 च्या शिखर परिषदेचा दुसरा दिवस आहे. या शिखर परिषदेला पोहचण्याआधी सर्वराष्ट्रप्रमुख राजघाटावर महात्मा गांधीच्या समाधीला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे खादीवस्र देऊन स्वागत केले. यावेळी पाठीमागे साबरमती आश्रमाचे चित्र लावले होते.

भारताच्या इतिहासात साबरमती आश्रमाचे महत्वाचे स्थान आहे. साबरमती नदीकिनारी १९१७ ला या आश्रमाची स्थापना केली होती. महात्मा गांधीनी १९१७ ते १९३० यादरम्यान साबरमती आश्रमात वास्तव्य केले होते.

सविनय कायदेभंगाला साबरमतीपासूनच या ठिकाणाहून सुरुवात झाली होती. शांतता आणि साधेपणा हे या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे. G20 परिषदेत जगभरातील वाढत्या महागाईवरही नेत्यांनी चर्चा केली आहे.

G20 नेत्यांनी सांगितले की, वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे जीवन जगण्याच्या खर्चावर दबाव येत असून त्यांनी फूड, अ‍ॅग्रीकल्चर आणि फर्टिलाइजर क्षेत्राबाबत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT