ISIS
ISIS Dainik Gomantak
देश

उदयपूर हत्याकांड ट्रेलर? ISIS च्या दहशतीची फॅक्टरी बनतोय 'भारत'

दैनिक गोमन्तक

Udaipur Murder Case: उदयपूरमधील हत्याकांडानंतर पुन्हा एकदा भारतातील इसिसच्या वाढत्या जाळ्याच्या चर्चेला वेग आला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर भारतात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढला आहे. देशातील मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 170 दशलक्ष किंवा 170 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. (Uidaipur Murder Case Is Trailer Know ISIS India Connection How ISIS Terror Factory Growing In India)

दरम्यान, इंडोनेशियानंतर (Indonesia) भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. इथे मुस्लिम लोकसंख्येचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कारण ISIS दहशतवाद आणि धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी मुस्लिम तरुणांना लक्ष्य करत आहे. अलीकडच्या घटनांनंतर भारत जिहादी दहशतवादी (Terrorist) संघटनांच्या रडारवर राहीला आहे. त्यामुळे त्याचा धोका आता अनेक पटींनी वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भारत नेहमीच ISIS च्या निशाण्यावर राहिला

भारत नेहमीच ISIS आणि अल कायदाच्या निशाण्यावर राहीला आहे. देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात अनेकदा हिंसक चकमकी झाल्या आहेत. या दहशतवादी संघटना या हिंसक चकमकींचा फायदा घेतात. द्वेषाचं बिज रोवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. जिहादी कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांच्या भरतीसाठी दहशतवादी संघटना भारताला लक्ष्य करत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.

इस्लामिक स्टेटच्या या यादीत भारताचा समावेश

इस्लामिक स्टेटच्या यादीत भारताचा (India) 19 वा क्रमांक लागतो. इस्लामिक स्टेटने भारताविरुद्ध दहशतवादी गटांशी संगनमत साधले आहे, त्यामुळे देशात ISIS चा धोका वाढला आहे. इस्लामिक स्टेटच्या खोरासान प्रांतात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारताचा काही भाग आणि आसपासच्या इतर देशांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT