Uddhav Thackeray should stop the daily dose of shameless politics Piyush Goyal 
देश

उध्दव ठाकरेंनी रोजचा निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवावा - पियुष गोयल

गोमंतक वृत्तसेवा

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोठ्या संख्येने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक एकीकडे चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन, आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या लसीच्या तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर मात्र राजकीय नेते एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी अत्यंत परखड शब्दामध्ये राज्यातील आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘’उध्दव ठाकरेंनी त्यांचा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवून योग्य ती जबाबदारी घ्यावी,’’ असं ट्विट पियुष गोयल यांनी केलं आहे. (Uddhav Thackeray should stop the daily dose of shameless politics  Piyush Goyal)

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडिसिव्हीरच्या पुरवठ्यावरुन टिका केल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चार ट्विट करत राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘’ऑक्सिजनच्या नावावरुन उध्दव ठाकरे यांनी चालवलेल्या युक्त्या पाहून दु:ख झालं आहे. केंद्रातील मोदी सरकार ऑक्सिजनचा उत्पादन अधिक व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आता आपण आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करुन दिला जात आहे,’’ असं पियुष गोयल म्हणाले आहेत. 

गोयल यांनी पुढच्या ट्विटमध्ये राज्याला सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला असल्याचा दावा केला आहे. ‘’आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सतत राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा  प्रयत्न करत आहे,’’ असं गोयल म्हणाले आहेत.

‘’कालच पंतप्रधानांनी घेतलेल्या आढावा बैठकीत केंद्र सरकर आणि राज्यसरकारांनी या कोरोनाच्या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे. परंतु हे सगळं राजकारण असताना उध्दव ठाकरे यांच्याकडून सुरु असलेलं राजकारण पाहून दु:ख होत आहे. त्यांनी हे निर्लज्ज राजकारण थांबवलं पाहिजे आणि जबाबदारी घतली पाहिजे,’’ असं देखील गोयल यांनी म्हटलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT