PNB Dainik Gomantak
देश

PNB: लाखमोल झाले मातीमोल, लॉकरमधल्या नोटांना लागली वाळवी

दैनिक गोमन्तक

PNB: पंजाब नॅशनल बॅंकेत एका कस्टमरच्या पैशांचे रुपांतर मातीमध्ये झाली असल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला कस्टमरने पंजाब नॅशनल बॅंकेच्या लॉकरमध्ये 2.15 लाख रुपए ठेवले होते.

मात्र आता त्या पैशांचे रुपांतर मातीमध्ये झालेले दिसून आले आहे. यानंतर महिला ग्राहकाने बॅंक कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता, बॅंक कर्मचारी आपली जबाबदारी टाळत असल्याची माहिती पीडीतीने माहिती दिली आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार उदयपूर मध्ये राहणाऱ्या सुनिता मेहता यांनी आपल्या नावाने पंजाब नॅशनल बॅंकेत लॉकर घेतले होते. लॉकरमध्ये 2.15 रुपये ठेवले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात लॉकर उघडले होते तेव्हा पैसे सुरक्षित होते. मात्र आता पैशांची गरज लागल्यानंतर सुनिता यांनी लॉकर उघडले तेव्हा नोटांना वाळवीने खाऊन टाकल्याचे दिसून आले.

या घटनेनंतर सुनिता मेहता यांनी बॅंक( Bank ) मॅनेजमेंटवर पेस्ट कंट्रोल न केल्याचा आरोप केला आहे. लॉकरमध्ये इतरही साहित्य आहे तेदेखील खराब झाल्याची शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार बॅंक मॅनेजरकडे केली आहे.

दरम्यान, बाकीच्या 20-25 लॉकरमध्येदेखील वाळवी लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. उच्च अधिकाऱ्यांपर्यत ही माहिती पोहचवली असून ग्राहकांच्या समस्यांचे समाधान केले जाईल असे पीएनबी( PNB )च्या सिनिअर मॅंनेजरने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT