Madhya Pradesh Dainik Gomantak
देश

मध्य प्रदेशात गोहत्येच्या संशयावरुन दोन तरुणांची हत्या, हिंदू संघटनांवर आरोप

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी जिल्ह्यात दोन आदिवासी तरुणांची लिंचिंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात दोन आदिवासी तरुणांची लिंचिंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एकीकडे खरगोन हिंसाचाराची जखम जिवंत असताना, दुसरीकडे, सिवनी जिल्ह्यातील बरघाट विधानसभा मतदारसंघातील (Assembly Constituency) सिमरिया गावात दोन आदिवासी तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. काल रात्री दोन आदिवासींना बजरंग दलाच्या लोकांनी गुरेढोरे असल्याच्या संशयावरुन पकडून बेदम मारहाण केली यातच त्यांचा मृत्यू झाला. (Two youths were killed in Madhya Pradesh on suspicion of cow slaughter)

दरम्यान, या प्रकरणावर संपूर्ण आदिवासी समाज संतप्त झाला आहे. यानंतर कुरईचा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बारघाटचे आमदार अर्जुन काकोडिया यांनीही घटनास्थळी जाऊन चक्का जाम केला. शिवराज सरकार ज्याप्रमाणे संपूर्ण मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवत आहे, त्याचप्रमाणे या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवावा, अशी मागणी आमदार काकोडिया यांच्याकडून करण्यात आली.

दुसरीकडे, बजरंग दल दलावर संपूर्ण मध्यप्रदेशात बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सिवनी एसपी आणि जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी आमदार काकोडिया यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरोपी तरुण फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून (Police) सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 15-20 लोकांच्या जमावाने या दोघांना बेदम मारहाण केली. कुरई पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. यातील सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2-3 संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT