two terrorists killed by Indian army in Kulgam at Jammu Kashmir

 

Dainik Gomantak

देश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 अतिरेकी ठार, भारतीय सैन्याची कारवाई

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात जवानांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी (Security Forces) दोन दहशतवाद्यांना (Terrorist) ठार केले असून कुलगाममधील रेडवानी भागात ही चकमक झाली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. परिसरात लपून बसलेल्या सर्व दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडण्याचा सुरक्षा दलांचा प्रयत्न आहे. या भागात आणखी दहशतवादी लपून बसले असावेत, असा सैनिकांना संशय आहे.(two terrorists killed by Indian army in Kulgam at Jammu Kashmir)

काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सूत्रांनी जवानांना दिली. त्यानंतर जवानांनी परिसराला पूर्णपणे वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना घेरल्यानंतर जवानांनी त्यांना शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले. मात्र जवानांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे.

याआधी बुधवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन (HM) दहशतवादी मारला गेला होता. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, "प्रतिबंधित दहशतवादी संघटना HM च्या 'A+' श्रेणीतील एक दहशतवादी पोलिस आणि सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे."त्यांनी सांगितले की, ठार झालेला दहशतवादी 2018 मध्ये जेनापुरा, शोपियान येथे झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. जेनापुरा येथे झालेल्या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले होते.

दरम्यान काश्मीर खोऱ्यात काही केल्या दहशतवादी हल्ले कमी होताना दिसत नाही आहेत २ ते 3 दिवसांपूर्वीच श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेरील भागामध्ये सोमवारी संध्याकाळी हा हल्ला झाला होता . अधिकृत सूत्रांनी सांगितले होते की, दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलिस बटालियनजवळ बसवर जोरदार गोळीबार केला.

तर काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती . राजपुरा भागातील उसगम पाथरी येथे ही चकमक झाली होती. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ही माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT