Covid 19 Vaccination Dainik Gomantak
देश

New Covid Vaccine: दिलासादायक! आता 'मेड इन इंडिया' दोन नव्या लसी भारतात होणार उपलब्ध

Corona Vaccine: भारतात लवकरच आणखी दोन कोरोना लस उपलब्ध होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतात लवकरच दोन नवीन कोरोना लस उपलब्ध होणार आहे्. या दोन्ही लसी पूर्णपणे भारतात बनवलेल्या आहेत. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी मंगळवारी टाईम्स अॉफ इंडयाच्या वृत्ताला माहिती दिली की CoWIN वर दोन नव्या "मेड-इन-इंडिया" लसी लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यात एक mRNA शॉट आणि दुसरी एक इंट्रानासल लस असे नाव आहे.

आरोग्यतज्ञ अरोरा यांच्या मते, भारतीय mRNA शॉट 2-8°C तापमानात साठवून ठेवता येते. त्याचप्रमाणे, इंट्रानॅसल लस देणे सोपे आहे. या लसींचा वापर प्राथमिक डोस म्हणून केला जातो. जेव्हा आम्हाला पुरेसा डेटा मिळतो, तेव्हा तो एक विषम बूस्टर म्हणून देखील देऊ शकतो." तसेच डॉ. अरोरा यांनी पुढे माहिती दिली कि देशात बूस्टर कव्हरेज सुधारण्याची गरज आहे. "लोकांनी अँटीबॉडीची पातळी वाढवण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा, विशेषत: जर प्राथमिक दोन डोस सहा महिन्यांपेक्षा जास्त आधी घेतले गेले असतील. अजूनही मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत ज्यांनी त्यांचा लस घेतलाली नाही.

कोरेनाची आकडेवारी

ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हायरसची एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 4,45,43,089 वर गेली आहेत. तर सक्रिय 47,379 वर आली आहेत. यासह देशात आतापर्यंत 5,28,370 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4,39,67,340 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.

कोरोना चाचणी

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू आहे. यासोबतच दैनंदिन कोरोना चाचणीही केली जात आहे. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत देशात 89,20,49,014 कोरोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

कोरोना लसीकरणावर भर दिला जातो आहे

कोरोनाशी लढण्यासाठी भारत (India) सरकार लसीकरणावर भर देत आहे. देशात आतापर्यंत 216 कोटी 95 लाख 51 हजार 591 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 12 लाख 27 हजार 54 लोकांना कोविड 19 लसीचा डोस देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT