Two brothers sexually abused by stepfather in Delhi. Dainik Gomantak
देश

माणूस की हैवान? सावत्र बापाकडून भावंडांचा लैंगिक छळ

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने वर्षभरापूर्वी मुलाच्या आईशी लग्न केले होते. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध पहिली तक्रार आली होती.

Ashutosh Masgaunde

Two brothers sexually abused by stepfather in Delhi:

दिल्लीत सावत्र बापाने दोन भावांचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.

पोलिसांनी सांगितले की, 46 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुलांच्या आईने १७ सप्टेंबर रोजी जगतपुरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी हा तिचा दुसरा नवरा असून दोन्ही मुले पहिल्या पतीची आहेत. महिलेने सांगितले की, तिचा सध्याचा नवरा तिच्या मुलांसोबत अयोग्य वर्तन करायचा, त्यांचे कपडे काढून वारंवार अश्लील कृत्ये करत असे.

उल्लेखनीय म्हणजे, 2022 मध्ये, या महिलेने जगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरुद्ध मुलासोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करत अशीच तक्रार दाखल केली होती, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्यांनी आरोपीला त्याच्या पूर्व दिल्लीतील घरातून अटक केली आहे. मुलांनी त्यांच्या आईच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर सावत्र बापाने अनैसर्गिक गुन्हे केले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीवर पॉक्सो कायदा, प्राणघातक हल्ला आणि अनैसर्गिक कृत्यांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने वर्षभरापूर्वी मुलाच्या आईशी लग्न केले होते. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्याविरुद्ध पहिली तक्रार आली होती. त्यावेळी लहान मुलाने सावत्र बाप सतत लैंगिक आत्याचार करत असल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी सांगितले की, लहान मुलाच्या आरोपांनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. काही दिवसांतच त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याने 10-12 महिने न्यायालयीन कोठडीत काढले, परंतु नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी पुन्हा आपल्या पत्नी आणि सावत्र मुलांबरोबर राहू लागला. 17 सप्टेंबर रोजी मोठ्या मुलाने सावत्र वडिलांकडून आपल्यावरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला.

मुलाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या नोकऱ्या करते. आई कामासाठी बाहेर असताना, सावत्र वडिलांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच शिवीगाळ आणि मारहाणीचाही आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT