Two booked in Bareilly for hoisting religious flag higher than tricolor. Dainik Gomantak
देश

Tricolour: तिरंग्यापेक्षा उंच फडकवला धार्मिक ध्वज, गुन्हा दाखल झाल्याने आरोपी फरार

National Flag: प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट, 1971 च्या कलम 2 अन्वये या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

Ashutosh Masgaunde

Two booked in Bareilly for hoisting religious flag higher than tricolor:

मशिदीवर तिरंग्यापेक्षा उंच धार्मिक ध्वज फडकवल्याबद्दल बरेलीमध्ये एका मौलवीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी, रविवारी शहरातील बारादरी भागात आणखी एका व्यक्तीवर असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नदीम खानवर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट, 1971 च्या कलम 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

देशाच्या ध्वज संहितेनुसार, “इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा बाजूला ठेवू नये”. एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आणि बारादरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक वकार अहमद यांनी तक्रारीची दखल घेतली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून नदीम फरार आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याला नोटीस बजावली जाईल आणि चौकशीला उत्तर देण्यास सांगितले जाईल.

स्थानिकांनी सांगितले की, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ईद मिलाद-उन-नबीच्या दिवशी धार्मिक ध्वज लावण्यात आला होता, तर स्वातंत्र्यदिनी छतावर तिरंगा फडकवण्यात आला होता.

वकार अहमद म्हणाले, “आम्ही या भागात एक टीम पाठवली तेव्हा आम्हाला आढळले की, तक्रार योग्य आहे. त्याच्यावर कारवाई केली जाईल.”

या घटनेबाबत एका यूजरने रविवारी ट्विटसह फोटो शेअर केला आणि बरेली आणि यूपी पोलिसांना टॅग केले होत. त्यानंतर हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हारल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

"पोलीस स्टेशन बारादरी येथील मोहल्ला चक महमूद पुराणात नदीम खान याने घराच्या छतावर राष्ट्रध्वजापेक्षा उंच धार्मिक ध्वज लावला आहे, हा देशाचा अपमान आहे," असे ट्विटमध्ये म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT