Twitter asked the court for a period of 2 months for new IT rules  Dainik Gomantak
देश

ट्विटरने कोर्टाकडे मागितली 2 महिन्यांची मुदत

मंगळवारी एका सुनावणीदरम्यान कोर्टाने नवीन आयटी नियमांच्या अंमलबजावणी बाबत विचारणा केली होती(Twitter)

दैनिक गोमन्तक

नवीन आयटी नियमांनुसार(IT Rules) अनुपालन करण्याच्या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टात(Delhi High Court)आपली भूमिका स्पष्ट करताना एक प्रतिज्ञापत्र सदर केले असून ट्विटरने(Twitter) या पत्रात म्हटले आहे की कंपनी भारतातही संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे.त्यानुसारच नवीन अधिकाऱ्याची नेमणूकही आम्ही लवकर करू

मंगळवारी एका सुनावणीदरम्यान कोर्टाने नवीन आयटी नियमांच्या अंमलबजावणी बाबत विचारणा केली होती त्याचसोबत नवीन अधिकारी कधी नेमणार असा सवालही कोर्टाने ट्विटरला विचारला होता त्याच प्रश्नांना उत्तर देत ट्विटरने ही माहिती दिली आहे.आरजीओची पूर्वीची नियुक्ती केवळ अंतरिम तत्त्वावर झाली होती आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याचे कोर्टाला सांगण्यात आले नव्हते, यावर न्यायाधीश रेखा पल्ली यांनी अपवादही स्वीकारला आहे .

दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात ट्विटरने म्हटले आहे की, “रहिवासी तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे अनुपालन करण्यासाठी कंपनीला 8 आठवडे लागतील. कंपनी भारतात संपर्क कार्यालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. संपर्क कार्यालय नवीन आयटी नियमांनुसार भारत सर्व संप्रेषणासाठी कायमचा संपर्क पत्ता असेल. "

ट्विटरने असेही नमूद केले आहे की नवीन आयटी नियमांनुसार पहिला अनुपालन अहवाल 11 जुलै पर्यंत अपेक्षित आहे. "ट्विटर व्यावसायिक गोष्टी करण्यात गुंतलेला आहे आणि ट्विटरचा वापरकर्ता आणि ट्विटरमधील करार कंपनीच्या व्यावसायिक अजेंडाच्या प्रगतीकडे आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

Goa Politics: "पक्षांतरबंदी हेच माझं उत्तर..." असं का म्हणाले विजय सरदेसाई? 2027 पर्यंत काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचं केलं स्पष्ट

VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

SCROLL FOR NEXT